Join us

कामवाल्या मुलीचं लग्न ठरलं, मालकिणीनं शेवटच्या दिवशी असं काही केलं, डोळे पाणावणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:26 IST

Viral Maid Getting Married Last Day At Work Women Give Gifts : ही महिला तिच्या घरातील नोकरांनाही स्वत:च्या घरचे सदस्य असल्यासारखे समजते.

लोक अनेकदा घरात काम करणाऱ्या नोकरांना एखाद्या मजूरासारखं समजतात. म्हणजे काम करा पैसे घ्या आणि निघा. त्यांच्याशी कोणतीही अटॅचमेंट नसते. पण नोकर, कामवाल्या बायका ही सुद्धा तुमच्या आमच्यासारखी पोटासाठी वाटेल ते काम करणारी माणसंच असतात ही गोष्ट खूप कमी जणांना समजते. असे लोक समाजात माणुसकची उत्तम ठरतात. अलिकडेच एक महिला तिच्या वर्तनामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ही महिला तिच्या घरातील नोकरांनाही स्वत:च्या घरचे सदस्य असल्यासारखे समजते. हा व्हिडिओ पाहणारे सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही भरून येईल. (Viral Maid Getting Married Last Day At Work Women Give Gifts Hug Her Emotional Viral Video)

इंस्टाग्राम युजर उर्वशी लालवानी एक कंटेट क्रिएटर आहे. तिला 50 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. अलिकडेच तिनं एक व्हिडिओ पोस्ट आहे आहे. ज्यात ती घरातल्या कामवाल्या मुलीची पाठवणी करत आहे. ती सांगते की प्रियाचं लग्न होणार आहे म्हणूनच तिनं तिचा कामाचा शेवटचा दिवस आनंदानं साजरा करत तिची पाठवणी केली आहे. उर्वशीनं प्रियाला टिका लावला, मिठाई भरवली आणि खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रियाला सोफ्यावर बसवून उर्वशीनं टिका लावला आहे. नंतर मिठाई भरवून तिला एक एक करून गिफ्टस दिले आहेत. या गिफ्ट्समध्ये साडी आणि इतर मेकअपच्या वस्तू आहेत. एका पाकीटात पैसेसुद्धा दिले आहेत. प्रिया जेव्हा रडू लागते तेव्हा उर्वशी तिला मिठी मारते आणि तिलाही अश्रू अनावर होतात. या दोघांना पाहून सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत.

पाण्याच्या टाकीत १ चमचा ही पांढरी पावडर घाला; टाकीत न उतरता-न घासताही होईल स्वच्छ

हा व्हिडिओ 91 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून या व्हिडिओला बरेच व्हिव्हज मिळाले आहेत. लोकांनी आपल्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहे. हा व्हिडिओ इंटरनेटचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे. एका युजरनं म्हटलं की हा व्हिडिओ पाहून त्या कामवाल्या मुलीच्या आईला रडू अनावर होईल. अनेकांनी कमेंट करून उर्वशीचे कौतुक केले आहे. एका युजरनं म्हटलं की इंटरनेटवर काहीही व्हायरल होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Maid's wedding day surprise: Employer's emotional farewell goes viral.

Web Summary : A heartwarming video shows an employer celebrating her maid's wedding. Urvashi Lalwani, an Instagram influencer, bid farewell to Priya with gifts, blessings, and tears, showcasing a bond beyond employer-employee. The video has garnered millions of views and heartfelt reactions.
टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल