पुऱ्या खायला सर्वांनाच आवडतं पण पुऱ्या लाटणं, तळणं हे खूपच किचकट काम असतं. म्हणून बरेचजण घरी पुरी करणं टाळतात. पुरी करण्याची सोपी पद्धत तुमचा वेळ वाचवू शकते तसंच तुमचं काम झटपट होईल. सणासुधीला चपाती, भाकरी करण्यापेक्षा पुरी करण्यास प्राधान्य दिलं जातं. अशावेळी तुम्ही पुरी करण्यासाठी तुम्ही जर खास ट्रिक्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं. एका इन्फ्लूएंसरनं असाच काहीसा जुगाड केला आहे. (Boy Uses Different Idea For Puri Making Puri Making Juggad)
घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून एक उपकरण तयार केलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येतंय की तुम्ही रोजचं काम सोपं करण्यासाठी थोडा विचार केला तरी तुमचं काम सोपं होऊ शकतं. या इन्फ्लुएंजरने एक स्टिलचा थोडा डबा लाकडाच्या छोट्या काठीला बांधला आहे आणि या काठीनं वाटी दाबून तो पुऱ्या बनवत आहे.
कशी केली पुरी
व्हिडीओमध्ये हा तरूण पिठाचे छोटे छोटे गोळे करून ओट्यावर ठेवतो. त्यानंतर त्यानं तयार केलेल्या जुगाड यंत्राच्या साहाय्यानं तो डबा पिठाच्या गोळ्यावर जोरात दाबतो. डब्याच्या खालचा भाग सपाट असल्यामुळे एका झटक्यात पिठाचा गोळा गोल गरगरीत पुरीच्या आकारात रुपांतरीत होतो. यामुळे तासनतास लाटण्यानं पुरी लाटण्याची मेहनत वाचते आणि काही मिनिटातंच झटभर पुऱ्या तयार होतात.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा जुगाड नेमका कसा केलाय ते बरोबर लक्षात येईल. या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. बरेच लोक या व्यक्तीचं हा शोध लावण्याबद्दल कौतुक करत आहेत. एका युजरनं त्याच्या या टॅलेंटचे कौतुक केले आहे. अनेकांनी याला भारचीय तंत्रज्ञान देसी जुगाड असं म्हटलं आहे. एका वापरकर्त्यानं गमतीनं म्हटलं की आता पुरी बनवणं इतकं सोपं झालंय की कोणीही कंटाळा करणार नाही.
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी नसून कमी संसाधनांत काम कसं सोपं करता येते याचे उत्तम उदाहरण यात दाखवले आहे. सणासुदीच्या काळात जेव्हा घरात मोठ्या प्रमाणात पुऱ्या करायच्या असतात तेव्हा अशा प्रकारचा जुगा़ड गृहिणींसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. कल्पकता आणि साध्या वस्तूंच्या वापरातून कठीण काम सोपं करणं हेच या व्हिडिओचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
