Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > त्याने प्रपोज केल्यावर सुरुवातीला लाजली आणि नंतर वेड्यासारखी सैरभैर झाली.. पाहा व्हायरल व्हिडिओ

त्याने प्रपोज केल्यावर सुरुवातीला लाजली आणि नंतर वेड्यासारखी सैरभैर झाली.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Funny Video: प्रपोज केल्यानंतर अशा पद्धतीने रिॲक्ट करणारी ही मुलगी कदाचित पहिलीच असेल. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 16:26 IST2022-10-03T16:25:23+5:302022-10-03T16:26:23+5:30

Funny Video: प्रपोज केल्यानंतर अशा पद्धतीने रिॲक्ट करणारी ही मुलगी कदाचित पहिलीच असेल. बघा तिचा व्हायरल व्हिडिओ...

Viral Funny Video: A Young girl lost her control after receiving proposal from a boy | त्याने प्रपोज केल्यावर सुरुवातीला लाजली आणि नंतर वेड्यासारखी सैरभैर झाली.. पाहा व्हायरल व्हिडिओ

त्याने प्रपोज केल्यावर सुरुवातीला लाजली आणि नंतर वेड्यासारखी सैरभैर झाली.. पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlights ती मुलगी खूप आनंदीत झाली. तिला तिच्या भावना आवरेना. आनंदाश्रूही आले. पण तेवढ्यात तिला काय झालं ते समजेना..

कॉलेजची ५ वर्षे या गोष्टीची तरुणाईमध्ये भलतीच क्रेझ असते. कोण कोणाला आवडतंय, कोण कोणाला प्रपोज करणार आहे किंवा केलं आहे, याची जबरदस्त चर्चा कॉलेज कट्ट्यावर रंगलेली असते. जो व्यक्ती आपल्याला प्रपोज (propose) करतो आहे, तो भलेही कधी कधी आवडत नसतो, पण आपण मात्र त्याला आवडतो आहोत, ही भावनाच पार सुखावून टाकणारी असते. त्यामुळे प्रपोज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला हो किंवा नाही म्हणायचे हा भाग वेगळा असला तरी तो क्षण सगळ्यांसाठीच खास असतो, हे नक्की.

 

आता प्रपोजल आल्यावर कोण कसं रिॲक्ट होतं हे ज्याच्यात्याच्या स्वभावावर आणि आवडीनिवडीवर अवलंबून आहे. पण ही मुलगी ज्या काही पद्धतीने रिॲक्ट झाली आहे, तसं कुणी होत नसावं.

सणासुदीला पुरणा-वरणाच्या स्वयंपाकाचं टेन्शन? ८ गोष्टी आधीच करा, फक्त दिड तासात स्वयंपाक तयार...

तिने दिलेली अजब गजब रिॲक्शन पाहून नेटकरी चांगलेच हैराण झाले असून हा व्हिडिओ पाहून हसावं की रडावं हेच कळत नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर तिने दिलेली प्रतिक्रिया पाहून या मुलीला प्रपोज करावं, असं त्या मुलाला का वाटलं, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. 

https://www.reddit.com/ वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. "I have no fucking idea..." असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओमध्ये काही कॉलेजचे तरुण मुलं- मुली दिसत आहेत.

मुगडाळ वाटते साधी पण आहे प्रोटीन्सचा खजिना, पण नेमकी खायची कशी? ही घ्या योग्य पद्धत

एक मुलगा त्या मुलीला प्रपोज करण्यासाठी तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि तिला घालण्यासाठी अंगठी पुढे केली. हे पाहून ती मुलगी खूप आनंदीत झाली. तिला तिच्या भावना आवरेना. आनंदाश्रूही आले. पण तेवढ्यात तिला काय झालं ते समजेना.. ती इकडे तिकडे पळू लागली. जोरजोरात ओरडू लागली. सुरुवातीला नॉर्मल वाटणारी ती नंतर नंतर तर अगदी वेड्यासारखं करू लागली. तिने नेमकं काय काय केलं आणि कसे कसे तिचे हावभाव बदलत गेले, हे एकदा व्हिडिओतूनच बघायला पाहिजे. 

Web Title: Viral Funny Video: A Young girl lost her control after receiving proposal from a boy