Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:49 IST

एक छोटी मुलगी पप्पांकडून मेकअप करून घेत आहे. हा मेकअप अतिशय स्पेशल आहे, कारण यात कोणत्याही केमिकल असलेल्या प्रोडक्टचा वापर न करता चक्क भाज्यांचा वापर करण्यात आला आहे. वडिलांनी लाडक्या लेकीचा 'ऑरगॅनिक मेकअप' केला आहे.

सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका गोड आहे की, असा व्हिडीओ तुम्ही आजपर्यंत पाहिलाच नसेल. यामध्ये एक छोटी मुलगी तिच्या पप्पांकडून मेकअप करून घेत आहे. हा मेकअप अतिशय स्पेशल आहे, कारण यात कोणत्याही केमिकल असलेल्या प्रोडक्टचा वापर न करता चक्क भाज्यांचा वापर करण्यात आला आहे. वडिलांनी आपल्या लाडक्या लेकीचा 'ऑरगॅनिक मेकअप' केला आहे.

तुफान व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसतं की, हे वडील आपल्या मुलीला केमिकल असलेले प्रॉडक्ट्स वापरू देत नाहीत. त्याऐवजी ते भाज्यांच्या मदतीने मुलीचा मेकअप करतात. हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलं! वडील चक्क ब्रोकली आणि बीटच्या मदतीने मुलीचा छान मेकअप करत आहेत.

मुलीचं गोड हसू आणि वडिलांचं प्रेम

वडिलांनी सर्वात आधी बीट मुलीच्या गालांवर लावलं, ज्यामुळे चिमुकलीचे गाल नैसर्गिकरीत्या गुलाबी झाले आणि बीटचा ब्लश लावला. त्यानंतर त्यांनी ब्रोकलीचा एक तुकडा घेतला आणि तो हलकासा गरम करून त्याने ब्लश केलं. जेव्हा आयशॅडोची वेळ आली, तेव्हा बाबांनी स्ट्रॉबेरीचा वापर करून मुलीचे डोळे आणखी सुंदर केले. हे सर्व करताना मुलगी खूप आनंदी दिसत आहे. मुलीचं गोड हसू आणि वडिलांचं प्रेम नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

हा व्हिडिओ 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर @TheFigen_ नावाच्या हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच वेगाने व्हायरल झाला. या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. "एक असे वडील जे मेकअपची परवानगी देत नाहीत, पण आपल्या मुलीला निराशही करू इच्छित नाहीत. त्यांनी यावर अतिशय गोड मार्ग शोधून काढला आहे" असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. व्हिडिओ पाहून एका युजरने "कदाचित मेकअपची सुरुवातही अशीच झाली असावी" अशी कमेंट केली.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओ