lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर.. व्हायरल व्हिडिओ

आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर.. व्हायरल व्हिडिओ

Viral Emotional Video of Mother who found her Son is Pilot on her Flight : हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2023 11:15 AM2023-08-04T11:15:28+5:302023-08-04T11:17:34+5:30

Viral Emotional Video of Mother who found her Son is Pilot on her Flight : हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.

Viral Emotional Video of Mother who found her Son is Pilot on her Flight : Mother sits in the plane and realizes that her Son is the pilot, tears of joy.. Viral video | आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर.. व्हायरल व्हिडिओ

आई विमानात बसली आणि कळले आपला लेकच पायलट आहे, आनंदाने अश्रू अनावर.. व्हायरल व्हिडिओ

आपल्या मुलांनी खूप शिकावं आणि मोठ्या हुद्द्यावर काम करावं अशी प्रत्येक आई वडीलांची इच्छा असते. यासाठी मूल लहान असल्यापासून ते त्याला सतत अभ्यास आणि इतर गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. मोठं झाल्यावर मुलांनी आपल्याला अभिमान वाटेल असं काही करावं असं पालकांना कायम वाटत असतं. बुहताश वेळा मुलंही तसा प्रयत्न करतात आणि आपल्या आई वडीलांच्या कष्टाचे चीज करुन दाखवतात. आपल्या मुलाला अमुक एखाद्या पदावर किंवा हु्द्यावर पाहून आई वडीलांना आनंदच होत असतो. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात आपल्या मुलाला पाहून आई यामध्ये अतिशय भावूक झाल्याचे दिसते (Viral Emotional Video of Mother who found her Son is Pilot on her Flight).  

तर त्याचे झाले असे की एक महिला विमानाने प्रवास करण्यासाठी विमानात प्रवेश करते. साधारणत: विमानात प्रवेश केल्यावर विमानातील कर्मचारी आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. यामध्ये काहीवेळा पायलटचाही समावेश असतो. अशाचप्रकारे पायलट विमानाच्या दरवाज्याशी प्रवाशांचे स्वागत करत होता. तेवढ्यात ही महिला त्याच्यासमोर येते आणि दोघेही एकमेकांना पाहून पुरते हादरतात. कारण आपण ज्या विमानाने प्रवास करणार आहोत त्याचा पायलट आपला मुलगाच असणार आहे याची या महिलेला अजिबातच कल्पना नसते. सुरुवातीला आनंदाने ही महिला ओरडताना दिसते. मग हे दोघेही एकमेकांना खूप घट्ट मिठी मारतात आणि मग या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. हा क्षण कॅमेरात कैद झाला असून तो पाहून काही क्षणांसाठी आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील एका पेजवर अपलोड करण्यात आला असून त्याच्या कॅप्शनमध्ये अभिमानी आई असं लिहीलं आहे. लाखो जणांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला असून आतापर्यंत जवळपास ८५ हजारहून अधिकांनी तो लाईक केला आहे. यावर नेटीझन्सनी भावनापूर्ण कमेंटस केल्या असून आईच्या प्रेमापुढे काहीच नाही, हृदय हेलावून टाकणारा क्षण, मुलाच्या कामगिरीचा अभिमान असलेली आई असे लिहीले आहे. या दोघांना पाहून विमानातले इतर प्रवासीही खूश होतात आणि त्यांच्या आनंदात सामील होतात. मुलाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना पाहून त्या आईला खूप आनंद झाला आहे, सोबतच मुलगा चालवत असलेल्या विमानात बसण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण झालं आहे.
 

 

 

 

Web Title: Viral Emotional Video of Mother who found her Son is Pilot on her Flight : Mother sits in the plane and realizes that her Son is the pilot, tears of joy.. Viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.