Join us

Viral Comedy Video : पाऊस सुरू झाला अन् जोडपं रिक्षात जाऊन बसलं; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 17:18 IST

Viral Comedy Video :रिक्षात बसल्यानंतर  काही सेकंदांनी या जोडप्याला खूप नामुष्कीला सामोरे जावे लागले.

सोशल मीडियावर रोज भरपूर मनोरंजनात्मक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुमचे मनोरंजन तर करेलच पण तुम्हाला खळखळून हसवेल. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पाऊस पडत असल्याचे दिसतंय. हा पाऊस टाळण्यासाठी एक कपल धावत जाऊन रिक्षात बसते. नंतर असं काही होईल  याची दोघांनाही कल्पना नसेल. (Viral comedy video of love couple falling funny from rikshaw trending fun scene video entertaining)

रिक्षात बसल्यानंतर  काही सेकंदांनी या जोडप्याला खूप नामुष्कीला सामोरे जावे लागले. प्रत्यक्षात दोघेही ज्या रिक्षात बसले होते ती अचानक मागच्या बाजूनं वाकते. त्यामुळे दोघेही विचित्र पद्धतीने खाली पडतात. रिक्षावाल्यालाही काय झाले ते लगेच समजत नाही. नंतर तो रिक्षावाला जोडप्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. दुसरी व्यक्ती येते आणि दोघांना बाहेर काढले जाते.

 शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....

हा व्हिडिओ पाहून लोक या कपलची खूप खिल्ली उडवत आहेत. एका युजरने (Social Media User) सांगितले की, दोघांनीही रिक्षात बसल्यावर बॅलन्स ठेवता आला नाही. आणखी एका युजरने लिहिले की, व्हिडिओ मेकर्स फक्त व्हिडिओ का बनवतात, मदत का करत नाहीत. या व्हिडिओला आतापर्यंत 87 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल