lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..

पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..

Vikrant Massey remembers taking ‘pocket money’ from then-girlfriend Sheetal for film auditions : महिन्याला कमवायचा ३५ लाख, एक काळ असाही आला जेव्हा ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 03:48 PM2024-02-19T15:48:25+5:302024-02-19T15:49:36+5:30

Vikrant Massey remembers taking ‘pocket money’ from then-girlfriend Sheetal for film auditions : महिन्याला कमवायचा ३५ लाख, एक काळ असाही आला जेव्हा ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे...

Vikrant Massey remembers taking ‘pocket money’ from then-girlfriend Sheetal for film auditions | पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..

पडत्या काळात विक्रांतला सावरलं, फिल्म ऑडिशन्सला जाण्यासाठी पैसे नसायचे, शीतलने केली मदत..

'जीवन साथी हम दीया और बाती हम' ९०s मधलं हे सुंदर गाणं आपण ऐकलंच असेल. पण खऱ्या आयुष्यात देखील कपल्स एकमेकांचे उन्हात सावली आणि पावसात छत्रीप्रमाणे सरंक्षण करतात (Relationship Tips). मुख्य म्हणजे आजन्म एकमेकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं महत्वाचं आहे. मग परिस्थिती कोणतीही असो, एकेमकांना पडत्या काळात सावरणं गरजेचं आहे.

प्रत्येक जण सपोर्टिव्ह पार्टनरची अपेक्षा ठेवतो, आणि त्यात काही चूक पण नाही (Vikrant Massey). अशाच गुणाची पार्टनर अभिनेता विक्रांत मेस्सीला लाभली. त्याने एका मुलाखतीत ऑडिशन्सला जाण्यासाठी त्याची पार्टनर तेव्हा पैसे देत असे, आणि पडत्या काळात सावरलं असल्याचं त्याने म्हटलं आहे(Vikrant Massey remembers taking ‘pocket money’ from then-girlfriend Sheetal for film auditions).

सपोर्टिव्ह पार्टनर असणं सोन्याहून पिवळं

बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या '12th Fail' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. यातील त्याने साकारलेली आयपीएस मनोज शर्मा यांची भूमिका प्रत्येकाला भावली. या चित्रपटाला यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सामान्य वर्गापासून ते मोठ्या सेलिब्रिटीजने विक्रांतच्या भुमिकेचं कौतुक केलं. चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वी विक्रांत छोट्या पडद्यावरचा उमदा कलाकार होता. त्याने बऱ्याच टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं, ज्यातून त्याला लोकप्रियता मिळाली.

वेळीच घरच्या घरी वॉटर प्युरिफायर साफ करा; नाहीतर तुमच्याही फिल्टरमध्ये जमा होतील लाल अळ्या

नुकतंच 'अनफ़िल्टर्ड बाय समदिश'च्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये विक्रांतने हजेरी लावली, आणि बऱ्याच वैयक्तिक आयुष्याबाबत उलगडा केला. एक वेळ असा होता, जेव्हा विक्रांत महिन्याला ३५ लाख कमवायचा. पण काही कारणास्तव त्याने टेलीव्हिजन विश्वाला राम राम ठोकत चित्रपटसृष्टीत येण्याचं ठरवलं. यामध्ये त्याला अनेक खडतर प्रसंगाला समोरे जावे तर लागलेच, शिवाय पडत्या काळात त्याच्या पार्टनरने ऑडिशन्सला जाण्यासाठी पैश्यांची मदत केली. 

पडत्या काळात पार्टनरने सावरलं..

यासंदर्भात, विक्रांत म्हणाला, 'टेलीव्हिजनच्या माध्यमातून मी बरीच कमाई केली. या कमाईतून मी पहिलं घर देखील घेतलं. परंतु, काही कालावधीनंतर बुरसटलेल्या विचारांच्या मालिकांचा मला कंटाळा आला. मी तेव्हा चित्रपटसृष्टीत नशीन आजमावण्याचं ठरवलं. पण तेव्हा घरच्यांना धक्का बसला.'

करीना म्हणाली, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सैफू! आणि सैफ काय म्हणाला? तीच ती घरोघरचीच कथा..

विक्रांत पुढे म्हणतो, 'तेव्हा टेलीव्हिजनमधून मी बक्कळ कमाई करत होतो. पण काही कलावधीनंतर मी तिकडचं काम घेणं बंद केलं. हळूहळू सेविंग्स देखील संपत होते. माझी पत्नी शीतल तेव्हा माझी गर्लफ्रेण्ड होती. मी तिच्याकडून तेव्हा पैसे घ्यायचो अन् ऑडिशनला जायचो.'

विक्रांतने चित्रपट आणि वेबसिरीजच्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी 'बालीका वधू, धरम वीर, कुबूल सारख्या नावाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. त्याच्या ‘मिर्जापुर’ आणि ‘क्रिमिनल जस्टिस’ या दोन्ही वेब सिरीज प्रचंड गाजल्या. 

Web Title: Vikrant Massey remembers taking ‘pocket money’ from then-girlfriend Sheetal for film auditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.