सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काहींमुळे वाद निर्माण होतात. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमुळे परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक विचारसरणी यांच्यात सुरू असलेला वाद पुन्हा समोर आला आहे.
एक महिला मंदिरात प्रवेश करण्यावरून पुजारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालते. या वादाचं मूळ कारण हे तिचे कपडे आहेत, मुलीने शॉर्ट्स घातल आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये मंदिराच्या गेटवर उभ्या असलेल्या एका महिलेला प्रवेश करण्यापासून रोखलं जातं. त्यानंतर ती संतप्त झाली आणि पोलीस अधिकारी आणि पुजारी यांच्याशी वाद घालू लागली.
"देवाने हे नियम बनवलेले नाहीत, तर माणसांनी हे नियम बनवले आहेत" असं महिलेने पोलिसांना आणि पुजाऱ्यांना सांगितलं. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या दुसऱ्या महिलेने या घटनेची महित दिली. एक महिला छोटे कपडे घालून मंदिरात गेली आणि तिला प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे असं सांगितलं. त्यामुळे आता चूक नेमकी कोणाची? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Woman got into a heated argument with the police and the priest after being denied entry for wearing shorts
— Hindutva Vigilant (@VigilntHindutva) October 1, 2025
Hindu temples should have a dress code for both genders. pic.twitter.com/asMegXPBed
VigilntHindutva नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. "मंदिरात जाण्यासाठी कपडे हा निकष असू नये. देव प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार दर्शन घेण्याचा अधिकार आहे. कपड्यांपेक्षा श्रद्धा खूप मोठी आहे" असं काही जण म्हणत आहेत.
दुसरीकडे, बरेच लोक या महिलेच्या कृत्याचा जाहीर निषेध करत आहेत. "मंदिर हे एक पवित्र स्थान आहे आणि तेथे शिस्त आणि शिष्टाचार पाळणं अत्यंत महत्त्वाचें आहे. मंदिरांमध्ये ड्रेस कोड असावा जेणेकरून गर्दीतही चांगलं वातावरण असेल. जर देवाचं दर्शन घेण्यासाठी जायचं असेल तर छोटे कपडे घालू नये" असं काही लोकांनी म्हटलं आहे.