Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video - "आता मी इंडियन गर्ल..."; लाल टिकली अन् 'सन सनाना'ची धून, जिंकली भारतीयांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:32 IST

रशियन-जॉर्जियन फिगर स्केटर अनास्तासिया गुबानोव्हाने तिच्या फिगर-स्केटिंगदरम्यान एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

रशियन-जॉर्जियन फिगर स्केटर अनास्तासिया गुबानोव्हाने तिच्या फिगर-स्केटिंगदरम्यान एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्यावर परफॉर्म करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. मिलान-कोर्टिना गेम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २०२६ च्या विंटर ऑलिम्पिकमध्ये रेकॉर्ड केलेल्या या परफॉर्मन्समध्ये गुबानोव्हाने शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्या 'अशोका' चित्रपटातील 'सन सनाना' आणि 'धुरंधर' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर दर परफॉर्म केलं.

सोशल मीडियावरीलव्हायरल व्हिडिओमध्ये गुबानोव्हा लाल आणि सोनेरी रंगाच्या आकर्षक पोशाखात आणि कपाळावर लाल टिकली लावलेली दिसत आहे, ज्यामुळे इंटरनेटवर उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ सुरू झाल्यावर ती 'सन सनाना' गाण्याच्या तालावर आपल्या नृत्याची कोरिओग्राफी करते. त्यानंतर म्युझिक 'धुरंधर'च्या टायटल ट्रॅकवर बदलतं, ज्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

व्हिडीओ शेअर करताना, पॉप कल्चर कव्हर करणाऱ्या @_thejuggernaut या इन्स्टाग्राम हँडलने लिहिलं, "जॉर्जियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या रशियन खेळाडूने तिच्या २०२५ च्या पात्रतेसाठी पंजाबी एमसीच्या 'जोगी' गाण्यावरही स्केटिंग केलं होतं." "मला भारतीय शैलीत सर्वात जास्त आरामदायी वाटतं" असे गुबानोव्हाने २०२५ मध्ये स्पोर्ट्स२४ ला सांगितलं होतं. "माझ्या मित्रांनी म्युझिक निवडायला मला मदत केली... आता मी एक 'इंडियन गर्ल' आहे, आणि मला ते खूप आवडतं" असंही म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ तेव्हापासून व्हायरल झाला आहे आणि त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेक युजर्सनी एका प्रतिष्ठित व्यासपीठावर हिंदी गाणी निवडल्याबद्दल गुबानोव्हाचं कौतुक केलं आहे. २०२४ मध्ये 'अशोका' चित्रपटातील 'सन सनाना' हे गाणं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवर चर्चेचा विषय बनलं होत, अनेक इन्फ्लुएन्सर्सनी या गाण्याच्या ऑडिओवर मेकअप लूक सादर केलं होतं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Russian skater's Bollywood dance wins hearts: 'Now I am Indian girl'

Web Summary : Anastasia Gubanova, a Russian-Georgian skater, captivated internet users with her Bollywood-inspired performance. She skated to 'Sun Sunana' and 'Dhurandhar' at the 2026 Winter Olympics, dressed in Indian attire. Gubanova expressed her comfort with Indian style and fondness for being an 'Indian girl'.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल व्हिडिओ