Join us

बाई...! तरूणीनं वांग्यांपासून बनवला ड्रेस, बघून लोकांना उर्फी जावेदची आली आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 13:41 IST

Viral Video : एका तरूणीचा असाच उर्फीची आठवण करून देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात या तरूणीनं वांग्याचा ज्या पद्धतीनं वापर केलाय, ते बघून तुम्हीही अवाक् व्हाल. 

Viral Video : उर्फी जावेदचे विचित्र डिझाईनच्या कपड्यांमधील अनेक व्हायरल व्हिडीओ-फोटो तुम्ही पाहिले असतील. त्यानंतर तिला कॉफी करणारे किंवा तिची खिल्ली उडवणारेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एका तरूणीचा असाच उर्फीची आठवण करून देणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात या तरूणीनं वांग्याचा ज्या पद्धतीनं वापर केलाय, ते बघून तुम्हीही अवाक् व्हाल.

हिवाळ्यात भरपूर लोक वांग्याचे वेगवेगळे पदार्थ आणि भाज्या खातात. भरपूर लोकांना वांगी आवडतात. कुणी रस्स्याची भाजी खातात तर कुणी वांग्याचं भरीत खातात. पण या तरूणीनं वांग्यांपासून चक्क ड्रेस बनवला आणि तो घातला सुद्धा. तरूणीनं भरीत बनवण्यासाठी आणलेल्या वांग्यांपासून ड्रेस बनवला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरूणी बाथरूममधून हा वांग्यांचा खास ड्रेस घालून बाहेर येताना दिसत आहे. वांग्यांपासून तिनं टॉप आणि स्कर्ट बनवला आहे. हा ड्रेस घालून स्टाईलनं वॉकही केला आहे. तसेच कॅमेराला पोजही देत आहे. मात्र, हा ड्रेस तरूणीच्या आईला आवडलेला दिसत नाही. कारण जेव्हा तरूणी बाथरूममधून हा ड्रेस घालून बाहेर येते, तेव्हा मागे उभी असलेल्या तिच्या आईचे हावभाव बघण्यासारखे आहेत.

तरूणीच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोकही यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांना ही तरूणीचा हा ड्रेस पाहून उर्फी जावेदची आठवण झाली. एकाने कमेंट केली की, 'उर्फी जावेदची बहीण सापडली'. या तरूणीच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये अशाप्रकारचे अजब कपडे घातलेले अनेक व्हिडीओ आहेत. काही लोक तिचं कौतुक करतात तर काही लोक तिला वेड्यात काढतात.

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके