lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > ३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

UP woman climbs electric pole after fight with husband over extramarital affair : विवाहित महिलेचा प्रियकरासाठी हाय वोल्टेज ड्रामा; विजेच्या खांबावर चढली आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 01:48 PM2024-04-05T13:48:15+5:302024-04-05T13:49:17+5:30

UP woman climbs electric pole after fight with husband over extramarital affair : विवाहित महिलेचा प्रियकरासाठी हाय वोल्टेज ड्रामा; विजेच्या खांबावर चढली आणि..

UP woman climbs electric pole after fight with husband over extramarital affair | ३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

३ मुलांची आई खांबावर जाऊन बसली; अजब तिची मागणी म्हणते ‘दोघांसोबत’ राहीन कारण..

आपण अनेकदा ऐकलं असेल नवऱ्याचं बाहेर अफेअर असतं, आणि पत्नीला कळताच ते दोघे मिळून यातून तोडगा काढतात (Social Viral). पण कधी महिलेचं अफेअर आणि तिने नवऱ्यासाठी नसून, प्रियकरासाठी हाय वोल्टेज ड्रामा केलं असल्याचं पाहिलं आहे का? तर हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहाच (Extramarital Affair). यात नवरा आपल्या प्रियकरासोबत असलेल्या नात्याला विरोध करतो म्हणून, विजेच्या खांबावर चढत, तिने आत्म्हत्याचा प्रयत्न केला.

हा व्हायरल व्हिडिओ पाहून आपल्याला नक्कीच, शोले चित्रपटातील धर्मेद्रचा टाकीवरचा सुसाईड सीन आठवेल. पण तिने विजेच्या खांबावर चढत हाय वोल्टेज ड्रामा केला का? महिलेची नक्की मागणी काय आहे? पाहूयात(UP woman climbs electric pole after fight with husband over extramarital affair).

विवाहित महिलेचा प्रियकरासाठी हाय वोल्टेज ड्रामा

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, '७ वर्षांपासून विवाहित महिलेचा शेजारच्या एका तरूणासोबत अफेअर होते. पतीने तिच्या या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला विरोध केला म्हणून, तिने अनेकदा आत्माहत्येचा प्रयत्न केला. कधी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी, तर कधी ती रेल्वे रूळांवर जाऊन झोपली. एवढंच नाही तर, तिने काही दिवसांपूर्वी विजेच्या खांबावर चढत जीव संपवण्याचा प्रयत्न केला.

तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल

व्हायरल व्हिडिओमध्ये स्थानिक तिला समजावून खाली उतरण्याची विनंती करत आहेत. तर, पोलिसही पती-पत्नी आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून या घटनेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, पत्नीच्या प्रियकराला तिच्यासोबतच राहायचे आहे. मात्र आम्हाला तीन मुलं आहेत आणि कौटुंबिक कारणांमुळं मी तिला सोडू शकत नाही. पण मला त्यांचे संबंधही मान्य नाहीत.'

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड भरपूर खाल्ले तर वजन कमी होते? पण कुणाचे-कुणी न खाणंच बरं..

'पती आणि प्रियकर दोघांसोबत राहायचं आहे'-महिलेची अजब मागणी

पतीला पत्नीच्या अफेअरची माहिती कळताच, तिने प्रियकरालाही घरातच राहू देण्याची मागणी केली. मात्र, पतीने तिच्या या मागणीचा विरोध केला. विरोध करताच तिने, विजेच्या खांबावर चढत जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक, पोलीस, आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले, व तिला सुरक्षितरित्या खाली उतरवले. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी मजेशीर कमेण्ट करून ट्रोल केलं आहे.

Web Title: UP woman climbs electric pole after fight with husband over extramarital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.