आई आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार असते. उत्तर प्रदेशची महिला बस कंडक्टर निधी तिवारीने हे सिद्ध केलं आहे. निधी ही आई आणि एक जबाबदार कर्मचारी आहे. ती तिच्या एक वर्षाच्या मुलाला कुशीत घेऊन बसमध्ये प्रवाशांचं तिकीट काढताना दिसली. निधीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि लोकांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील झाशी येथील असल्याचं सांगितलं जातं. त्यात निधी बसमध्ये कंडक्टरच काम करताना दिसत आहे, तिच्यासोबत तिचा लहान मुलगा देखील आहे. निधी ही जालौन जिल्ह्यातील एट पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे आणि ओराई डेपोमध्ये कंडक्टर म्हणून काम करते. ती दररोज सकाळी ६ वाजता तिच्या मुलासह घरातून निघते आणि दुपारी १२ वाजेपर्यंत तिचं काम करते.
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
लेकाला कुशीत घेऊन 'ती' बजावतेय कर्तव्य
निधीचा नवरा मोहित हा ई-रिक्षा डिस्ट्रीब्यूटरडे काम करतो. या कपलने लव्ह मॅरेज केलं होतं आणि आता त्यांना एक वर्षाचा गोड मुलगा आहे. काही कारणांमुळे ती कुटुंबापासून वेगळे राहते. निधीला तिच्या मुलाला घरी एकटं सोडून कामावर जाणं खूप अवघड जातं, म्हणून ती तिच्या मुलाला आपल्यासोबत बसमध्ये घेऊन घेते आणि काम करते.
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
लोकांनी केलं भरभरून कौतुक
निधीने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिच्या मुलाला भूक लागते तेव्हा ती रस्त्यात त्याला बाटलीने दूध पाजते आणि दुसऱ्या हाताने तिकिट काढण्याचं काम करते. कधीकधी ती मुलाला स्कार्फने सीटवर बांधून ठेवते आणि लक्ष देते. निधी तिवारीच्या कर्तव्यनिष्ठेला सर्वांनीच सलाम केला आहे. यासोबतच तिचं कौतुक केलं आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
