अलीकडेच लाँच झालेल्या iPhone 17 Pro Max ची भारतीयांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. लोक तो खरेदी करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. अनेक जण हा नवीन फोन मिळविण्यासाठी तासनतास दुकानांबाहेर रांगेत उभे होते. याच दरम्यान एक तरुणीची जोरदार चर्चा रंगली आहे. इन्फ्लुएन्सर असलेल्या तरुणीने आयफोन खरेदी करण्यासाठी थेट लोकांकडेच डोनेशन मागितलं आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील रहिवासी 'ब्युटी क्वीन' माही सिंह iPhone 17 Pro Max खरेदी करण्यासाठी तिच्या फॉलोअर्सना एक, दोन रुपये देण्यास सांगत आहे. याची भारतात किंमत अंदाजे १.४९ लाख आहे. माहीच्या वडिलांनी तिला तीन महिन्यांपूर्वीच आयफोन १६ भेट दिला आहे, त्यामुळे आता त्यांनी पुन्हा नवीन आयफोन खरेदी करण्यास नकार दिला.
लखीमपुर की ब्यूटी क्वीन माही सिंह एक एक,दो दो रुपये मांग रही है 17 प्रो मैक्स फोन लेने के लिए..... pic.twitter.com/YvpoJymsH9
— Sajid Ali (@Sajid7642) September 25, 2025
सोशल मीडियावर माही सिंहचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. "आयफोन १७ प्रो नुकताच लाँच झाला आहे आणि मला त्याचा रंग खूप आवडला. तीन महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांनी मला आयफोन १६ विकत घेऊन दिला. आता २१ ऑक्टोबर रोजी माझ्या वाढदिवसासाठी मला हा नवीन आयफोन घ्यायचा आहे, पण माझे वडील मला तो विकत घेऊन देत नाहीत."
"जर तुम्ही सर्वांनी एक-दोन रुपयांची तरी मदत केली तर मी हा आयफोन खरेदी करू शकते आणि मी तुमची खूप आभारी राहीन. यामुळे माझे स्वप्न पूर्ण होईल. प्रामाणिकपणे सांगायचं झालं मला हा आयफोन इतका आवडला की त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत" असं माही सिंहने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांकडे पैसे मागत असल्याने तिला ट्रोल देखील करण्यात येत आहे. तिच्या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे.