Join us
Daily Top 2Weekly Top 5

Umbrella & Raincoat : ऐन पावसात छत्री तुटली, रेनकोट फाटला तर तारांबळ उडते? 6 टिप्स, वर्षानुवर्ष टिकतील छत्र्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:21 IST

Umbrella & Raincoat : कधी छत्रीच्या काड्या मुडतात तर कधी बटन्स खराब होतात. काहीवेळा मुलांचे रेनकोट फाटतात त्यामुळे पुन्हा खर्च करावा लागतो.

देशाच्या विविध भागात पावसाला  जोरदार सुरूवात झाली आहे. पाऊस जितका सुखावणार वाटतो तेव्हढाच कधी अडचणीत टाकतो. पावसाळ्यात  कपडे लवकर सुकत नाहीत घरात कुबट वास येतो तर कधी छत्र्यांना खूपच जास्त वास येतो. (Monsoon 2022) महागड्या छत्र्या रेनकोट घेऊनही त्या टिकत नाहीत. कधी छत्रीच्या काड्या मुडतात तर कधी बटन्स खराब होतात. काहीवेळा मुलांचे रेनकोट फाटतात त्यामुळे पुन्हा खर्च करावा लागतो. या लेखात तुम्हाला पावसाळ्याचे साहित्य टिकून राहावेत यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. (Umbrella & Raincoat)

१) छत्री किंवा रेनकोट वापरानंतर पूर्णपणे सुकवून मग घडीकरून हात ठेवा.  छत्री किंवा रेनकोट ओली राहिल्यास दुर्गंध येऊ शकतो याशिवाय छत्रीच्या दांड्याला गंजही लागतो.

२) वादळ,  जोरदार पाऊस आल्यनंतर हवेमुळे छत्र्या तुटतात अशावेळी छत्र्या घट्ट पकडा किंवा जोरदार हवा असल्यास एखाद्या ठिकाणी थांबून थोड्यावेळानं पुन्हा चालायला सुरूवात करा.

३) पाऊस आणि उन्हाळ्यासाठी वेगवेगळ्या छत्र्या असतात. खूप लोक याकडे लक्ष देत नाहीत.  जर तुम्ही पावसाळ्यात  उन्हाळ्याची छत्री घेऊन गेलात तर लवकर खराब होऊ शकते. 

गणिताच्या टिचरला 'बकरी' म्हणायचे विद्यार्थी, त्यांनी सांगितलेलं कारण ऐकून शिक्षिकेच्या डोळ्यात आलं पाणी..

४) रेनकोट धुणं प्रत्येकवेळी शक्य नसतं. ज्या रेनकोट्सच्या टॅगवर वॉशेबल असं लिहिलेलं असतं असे रेनकोट्स तुम्ही डिर्टेजंटमध्ये धुवू शकता. सुरूवातीला अर्धा तास भिजवल्यानंतर रेनकोट पाण्यानं धुवा. जर मुलांचे रोनकोट विकत घेताना स्टिचिंग व्यवस्थित तपासून मगच घ्या.

५) रोनकोटवर माती लागली असेल तर ती सर्व काढून मग रेनकोट धुवायला घ्या किंवा तुम्ही ओल्या कापडानं पुसून  रेनकोट धुवू शकता. 

होणाऱ्या नवऱ्याला स्टेजवर पाहताच नवरीला अश्रू अनावर; शेवटी जे घडलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील

६) छत्री धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. केमिकल क्लिनरचा वापर करू नका. छत्री ठेवण्यासाठी छत्रीची स्वतंत्र बॅग वापरा.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल