Join us  

'सौ आसमानों को छोड के आयी तेरे पास!' -नवरीची रोमँटिक एंट्री, प्यार हो तो ऐसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 4:09 PM

Social viral: लग्नात नवरा- नवरीने कशी एन्ट्री घ्यायची, (entry of a bride) याचं खूप सुंदर आणि उत्तम उदाहरण पाहायचं असेल, तर हा व्हिडियो एकदा बघायलाच हवा... 

ठळक मुद्देहा व्हिडियो बघणारा प्रत्येक जण नवरीच्या आणि तिच्या नृत्याच्या प्रेमात पडत आहे. 

सध्या लग्नात प्रत्येक इव्हेंटच अगदी स्पेशल असतो. तशीच खास तयारी केली जाते नवरा नवरीच्या लग्नमंडपात होणाऱ्या एन्ट्रीसाठी. हा एक प्रसंग असा असतो, ज्यावेळी लग्नासाठी आलेले बहुसंख्य लोक नवरदेवाला आणि नवरीला (bride and groome) पहिल्यांदाच पाहणार असतात. म्हणूनच तर लग्नमंडपात येण्याचा हा खास प्रसंग सगळ्यांना लक्षात रहावा आणि यादगार व्हावा, असा अनेकांचा प्रयत्न असतो.. अशीच एक धमाकेदार एन्ट्री केली आहे एका नवरीने.

 

गुरुग्राम येथील सबा कपूर (Saba Kapoor) या नवरीचा हा व्हिडियो आहे. तिचा हा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर झाला असून तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत तुफान हीट झाला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले असून नेटकरी पुन्हा पुन्हा सबाचा सुंदर डान्स बघत आहेत. डोक्यावर फुलांची चादर घेऊन येणारी किंवा डोलीत बसून येणारी नवरी आपण नेहमीच बघतो. किंवा नवरी येते आणि आजूबाजूला तिची भावंड, मित्रमैत्रिणी उभे राहतात आणि तिच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात, हे देखील आपण बऱ्याचदा पाहिलेलं असतं.. म्हणूनच तर डान्स करत करत सबाने लग्न मंडपात एन्ट्री (bride is dancing) घेतली खूपच वेगळी ठरली आहे.

 

या व्हिडियोमध्ये 'बार बार देखो' (hindi movie bar bar dekho) या चित्रपटातील 'सौ आसमानों को छोड के आयी तेरे पास...' या गाण्यावर नवरी नृत्य करताना दिसते आहे. तिने हलका पिंक रंगाचा लेहेंगा घातला असून ती त्यात खूपच सुंदर दिसते आहे. प्रवेशद्वारापासून तिचे भाऊ- बहिण, मित्र- मैत्रिणी आणि नातलग असे सगळे दोन्ही बाजूने उभे राहिलेले आहे. या दोन रांगांच्या मधून सबा म्हणजेच नवरी लग्नमंडपात प्रवेश करते आहे. या व्हिडियोची गंमत म्हणजे सबासोबत दोन्ही बाजूला रांगेत उभे असलेले लोकही तिच्यासोबत खूपच छान डान्स करत आहेत. प्रत्येकाच्या स्टेप्स वेगळ्या आहेत. पण तरीही प्रत्येकाचे एकमेकांशी आणि नवरीचे त्या प्रत्येकाशी असेलेले कोऑर्डीनेशन (dance coordination) जबरदस्त झाले आहे.

 

सगळ्यात शेवटी नवरी नाचत नाचत नवरदेवापाशी येते. हळूच त्याच्यासाठी आणलेली अंगठी त्याला दाखवते अणि त्याच्यापुढे गुडघ्यावर बसत त्याला अंगठी दाखवून प्रपोज करते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही अतिशय सुंदर असून हा व्हिडियो बघणारा प्रत्येक जण नवरीच्या आणि तिच्या नृत्याच्या प्रेमात पडत आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामलग्न