प्रत्येक घरातील ऑफिसला जाणाऱ्या व्यक्ती आणि शाळेत जाणारी लहान मुलं रोज टिफिन बॉक्स नेतातच. काहीजण स्टीलचे टिफिन बॉक्स वापरतात तर काहीजण प्लास्टिकचे. टिफिन बॉक्स हा अगदी रोजच्या वापरातील असल्यामुळे तो रोज स्वच्छ धुतला जातोच, परंतु तरीही अनेकदा या टिफिन बॉक्समधून कुबट (tips to keep lunch box odor free) अशी दुर्गंधी येऊ लागते. टिफिन बॉक्समधून येणारी कुबट दुर्गंधी ही केवळ त्रासदायकच (best way to remove lunch box smell) नाही तर डब्यातील अन्नपदार्थांधी चवही बिघडवते. या रोजच्या वापरातील टिफिन बॉक्समध्ये, दिवसभर अन्नपदार्थ राहिल्यामुळे किंवा डबा व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे एक प्रकारचा कुबट दुर्गंध येऊ लागतो. हा वास इतका तीव्र असतो की कितीही धुतला तरी तो जात नाही आणि यामुळे जेवणाची मजाही निघून जाते(Tips & tricks to keep clean & odor free lunch box of kids).
अनेकदा टिफिन बॉक्स उघडला तरी त्यातून दुर्गंधी येते अशी तक्रार घरातील मंडळी करतात. अशावेळी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या सोप्या उपायांनी हा वास सहज घालवता येतो. काही साधे आणि असरदार उपाय आहेत, जे तुमच्या टिफिन बॉक्सला पुन्हा नव्यासारखे स्वच्छ आणि दुर्गंधरहित करु शकतात. नेहमीच्या वापरल्या जाणाऱ्या टिफिन बॉक्समधून (home remedies for lunch box odor) कुबट, घाणेरडी दुर्गंधी येऊ नये म्हणून नेमके काय घरगुती उपाय करता येतील ते पाहूयात...
टिफिन बॉक्समधून कुबट - घाणेरडी दुर्गंधी येऊ नये म्हणून उपाय...
१. तमालपत्र आणि लवंग :- तुमच्या रोजच्या टिफिन बॉक्स मधून येणारा कुबट वास घालवण्यासाठी तमालपत्र आणि लवंग हे दोन्ही पदार्थ खूपच फायदेशीर आहेत. हे दोन्ही पदार्थ प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. त्यांचा नैसर्गिक सुगंध कुबट वास तर घालवतोच, पण डब्यातील बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ थांबवण्यासही मदत करतो. टिफिन व्यवस्थित धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या. एका छोट्या कापडात एक तमालपत्र आणि दोन लवंगा एकत्र बांधून त्यांची एक पुडी तयार करा. ही पुडी डब्यात ठेवून झाकण बंद करा. डबा ४ ते ५ तास किंवा रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी ही पुडी बाहेर काढून डबा काही वेळ उघडा ठेवा, जेणेकरून लवंग आणि तमालपत्राचा तीव्र वास कमी होईल. ही सोपी युक्ती वापरून तुम्ही तुमच्या डब्याला नेहमी स्वच्छ आणि दुर्गंधरहित ठेवू शकता.
२. सिलिका जेलचा वापर :- बूट किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बॉक्समध्ये मिळणारे छोटे सिलिका जेलचे पॅकेट टिफिनमधील वास घालवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हे पॅकेट डब्यातील ओलावा शोषून घेतात आणि त्यामुळे दुर्गंधी निर्माण होत नाही. सर्वप्रथम, सिलिका जेलचे पॅकेट काही वेळ उन्हात ठेवून 'रिचार्ज' करा. टिफिन व्यवस्थित धुवून हवेवर सुकवा आणि कपड्याने पुसून घ्या. आता, टिफिनमध्ये एक सिलिका जेलचे पॅकेट ठेवा आणि झाकण बंद करा. दुसऱ्या दिवशी डब्यात पदार्थ भरण्याआधी हे पॅकेट बाहेर काढायला विसरू नका. मग डबा पुन्हा स्वच्छ धुवून घ्या.
तांदळात अळ्या, पोरकिडे होऊ नये म्हणून, घाला ही जादूई पोटली, खराब न होता तांदूळ टिकेल वर्षानुवर्षे...
३. कॉफी पावडर :- कॉफीचा वास इतर दुर्गंधी शोषून घेण्यासाठीही खूप फायदेशीर असतो. यासाठी तुम्ही वापरलेल्या कॉफी पावडरचाही उपयोग करू शकता. वापरलेली कॉफी पावडर पूर्णपणे सुकवून घ्या. ती सुकी पावडर एका मलमलच्या किंवा सुती कापडाच्या छोट्या पिशवीत भरा. ही पिशवी रात्रभर टिफिनमध्ये ठेवून झाकण बंद करा. सकाळी डब्यात पदार्थ भरण्याआधी ही पिशवी बाहेर काढा. जर तुम्हाला काही दिवस टिफिन वापरायचा नसेल, तर ही पिशवी आतच राहू द्या. कॉफीची पिशवी टिफिनमधील दुर्गंध पूर्णपणे शोषून घेते आणि डब्याला एकदम 'फ्रेश' ठेवते.
मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी अजिबात करु नका ‘ही’ ५ कामं, त्यांचा जातो मूड-अभ्यासात लागत नाही लक्ष...