Lokmat Sakhi >Social Viral > जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी...

जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी...

Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion : clean burnt utensils with onion : onion trick for cleaning burnt vessels : home remedy for burnt utensils cleaning : kitchen hacks for burnt pans : natural method to clean burnt utensils : onion peel cleaning hack : how to remove burnt stains from utensils : easy trick to clean burnt kadai with onion : onion cleaning tips for kitchenware : जळकी, करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा वापर कसा करावा याची सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 13:01 IST2025-09-02T13:00:28+5:302025-09-02T13:01:25+5:30

Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion : clean burnt utensils with onion : onion trick for cleaning burnt vessels : home remedy for burnt utensils cleaning : kitchen hacks for burnt pans : natural method to clean burnt utensils : onion peel cleaning hack : how to remove burnt stains from utensils : easy trick to clean burnt kadai with onion : onion cleaning tips for kitchenware : जळकी, करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा वापर कसा करावा याची सोपी ट्रिक

Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion how to remove burnt stains from utensils onion cleaning tips for kitchenware easy trick to clean burnt kadai with onion clean burnt utensils with onion | जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी...

जळकी भांडी होतील स्वच्छ! १ कांदा वापरा ३ प्रकारे आणि पाहा कमाल - भांडी दिसतील नव्यासारखी...

स्वयंपाक घरात काही भांड्याचा वापर आपण रोज करतोच. रोजच्या वापराने ही भांडी खराब होतात. इतकंच नव्हे तर, भांडी रोज वापरताना कधी दूध उकळताना, कधी भाजणी करताना किंवा कढईत कोणताही पदार्थ राहिला तर तो करपून जातो आणि तळाला काळा थर चिकटून बसतो. भांड्यांच्या पृष्ठभागाशी असणारा (home remedy for burnt utensils cleaning) हा जळका, काळाकुट्ट थर काढणे म्हणून सर्वात कठीण आणि (easy trick to clean burnt kadai with onion) किचकट काम. भांड्यांच्या पृष्ठभागाशी असलेला हा थर लगेचच एका धुण्यात सहजासहजी निघत नाही. याचबरोबर, हा काळाकुट्ट, चिकट थर काढताना भांडी फार घासावी लागतात, इतकेच नव्हे तर भांडी घासल्याने त्यांची चमक देखील निघून जाते(Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion).

यासाठीच, स्वयंपाक घरातील अशी जळकी, करपलेली भांडी स्वच्छ करणे म्हणजे फारच किचकट काम. अशी भांडी स्वच्छ करण्यासाठी, बाजारातील महागडे क्लिनर्स, साबण, लिक्विड सोप यांचा वापर करतो. हे सगळे उपाय तर आपण करून पाहतोच परंतु, जळक्या किंवा करपलेल्या भांड्यांवरील काळाकुट्ट, चिकट थर काढण्यासाठी फक्त एक कांदा पुरेसा आहे. आपण स्वयंपाक घरातील कांदयाचा वापर करून करपलेल्या भांड्यांवरील चिकट थर अगदी सहजपणे काढू शकतो. कांद्याच्या (onion cleaning tips for kitchenware) मदतीने तुम्ही करपलेली भांडी अगदी सहज आणि कमी वेळेत स्वच्छ करू शकता. जळकी किंवा करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा वापर नेमका कसा करावा याची सोपी ट्रिक पाहूयात.. 

जळकी, करपलेली भांडी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक.. 

अनेकदा भांड्यांचा पृष्ठभाग भरपूर काळाकुट्ट होतो. काहीवेळा पदार्थ करताना तो जळतो, करपतो त्यामुळे हा जळका थर भांड्याना चिकटतो तो स्वच्छ करण्यासाठी कांदा वापरण्याची भन्नाट ट्रिक पाहा. 

१. कांदा आणि व्हिनेगर :- जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांदा आणि व्हिनेगर वापरणे अतिशय फायदेशीर ठरते. जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांदा आणि व्हिनेगर असरदार ठरते.  यासाठी, अर्धा कप कांद्याचा रस काढून घ्या आणि त्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळा. हे द्रावण जळालेल्या भांड्यात टाकून १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर, स्क्रबरने भांडे घासा. यामुळे भांड्यावरील काळेपणा आणि जळलेल्याचे डाग हळूहळू निघून जातील आणि भांडे पुन्हा नवीन असल्यासारखे चमकू लागेल. हा उपाय जुनी जळलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. 

वाटीभर कोल्ड ड्रिंक करते काळेकुट्ट कढई - तवे  स्वच्छ! भांडी दिसतील लखलखीत - पाहा सोपी ट्रिक...

२. कांदा आणि बेकिंग सोडा :- जर भांड अगदी जास्त करपलेलं किंवा भांड्यांचा पृष्ठभाग खूपच चिकट, तेलकट आणि काळाकुट्ट झाला असेल तर कांदा आणि बेकिंग सोडा वापरणे फायद्याचे ठरते. यासाठी, सर्वप्रथम भांड्यावर थोडा बेकिंग सोडा भुरभुरा. त्यानंतर, अर्धा चिरलेला कांदा घेऊन तो भांड्यावर चांगला घासा. यानंतर, त्या भांड्यात गरम पाणी टाकून सुमारे १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. २० मिनिटानंतर भांडे व्यवस्थित धुवून घ्या. हा उपाय भांड्यावरील जळलेला थर सहज काढतो आणि भांडी स्वच्छ करणे खूप सोपे होते.

बाप्पाच्या पूजेसाठी वापरलेल्या दिव्यातील वाती फेकू नका! १० मिनिटांत करा पारंपरिक पद्धतीने घरगुती काजळ... 

३. कांद्याच्या साली :- फक्त कांदा आणि कांद्याचा रसच नाही तर कांद्याच्या साली देखील, भांड्यांचा जळका, पृष्ठभाग सहज स्वच्छ करतात. जळालेल्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात कांद्याच्या काही साली टाका. हे भांडे गॅसवर काही वेळ उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी फेकून द्या. मग स्क्रबर किंवा ब्रशने भांडे घासून स्वच्छ करा.   

कोणतंही स्ट्रिक्ट डाएट नाही, ना जिम! तरीही भूमी पेडणेकरने केले तब्बल ३५ किलो कमी - पाहा फिटनेसचे सिक्रेट... 

ज्या भांड्यांवर काळे डाग जमा झाले आहेत त्यांच्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याचा वापर करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्यात कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर होत नाही. ही पद्धत पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यामुळे तुमच्या हातांना किंवा भांड्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. कांद्यामध्ये असलेले नैसर्गिक ऍसिड आणि बॅक्टेरिया-विरोधी गुणधर्म भांडी स्वच्छ करण्यासोबतच त्यातील दुर्गंधी देखील काढून टाकतात.

Web Title: Tips & Tricks Effective Home Method To Clean Burnt Utensils Using Onion how to remove burnt stains from utensils onion cleaning tips for kitchenware easy trick to clean burnt kadai with onion clean burnt utensils with onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.