मिरच्या चिरल्यानंतर हातांची जळजळ होणं ही एक कॉमन समस्या आहे. जेव्हा तुम्ही लाल किंवा हिरवी मिरची चिरत असाल तेव्हा अधिक काळजी घ्यावी लागते (Cooking Hacks). यातील कॅप्साइसिन नावाचे तत्व त्वचेला जळजळ, खाज येण्यास कारणीभूत ठरते. मिरची चिरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून हातांची जळजळ होणार नाही. ५ टिप्स वापरून हातांची जळजळ कमी होण्यास मदत होईल. (Tips to Avoid Burning Sensation In Your Hands After Cutting Chillies)
मिरची चिरण्यापूर्वी तेल किंवा तूप लावा
मिरची चिरण्यापूर्वी तुमच्या हातांना थोडे तेल किंवा तूप लावा. यामुळे तुमच्या त्वचेवर एक संरक्षक थर तयार होईल. हा थर कॅप्साइसिन थेट त्वचेच्या संपर्कात येण्यापासून रोखतो,ज्यामुळे जळजळ होत नाही. हा उपाय सर्वात सोपा आणि प्रभावी आहे.
नवरात्रात पटकन करा मऊसूत,लुसलुशीत उपवासाच्या इडल्या;पाहा इडलीची सोपी रेसिपी
दूध किंवा दही वापरून हात धुवा
जर तुमच्या हातांची जळजळ सुरू झाली असेल, तर साध्या पाण्याने हात धुण्याऐवजी दूध किंवा दह्याचा वापर करा. कॅप्साइसिन हे पाण्यापेक्षा दुधातील फॅट्समध्ये लवकर विरघळते. यामुळे, एका वाटीत थोडे थंड दूध किंवा दही घेऊन त्यात हात बुडवून ठेवा. काही मिनिटांतच जळजळ कमी होईल.
हात साबणाने धुवा
मिरची चिरल्यानंतर लगेचच हँडवॉश किंवा डिशवॉश जेल वापरून हात स्वच्छ धुवा. साबण मिरचीचे कण काढून टाकण्यास मदत करतात. मिरची चिरल्यानंतर लगेचच हात धुणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून त्वचेवर जळजळ जास्त वेळ राहणार नाही.
१ खास ट्रिक वापरून करा भरली कारली; कारलं अजिबात कडू लागणार नाही-आवडीने खातील सगळेच
बर्फाचा वापर करा
हातांना खूप जास्त जळजळ होत असेल, तर बर्फाचा वापर करा. एका कापडात बर्फ घेऊन तो हातावर हलक्या हाताने चोळा. यामुळे हातांना थंडावा मिळेल आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही थंड पाण्याच्या बादलीत हात बुडवून ठेवू शकता.
लिंबू आणि मीठ
थोडे लिंबू आणि मीठ एकत्र करून हातांवर हलक्या हाताने चोळा. मीठ त्वचेवरील तेल आणि कॅप्साइसिनचे कण काढण्यास मदत करते, तर लिंबातील आम्लता या प्रक्रियेला गती देते. यानंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही मिरची चिरताना होणारी हातांची जळजळ सहज टाळू शकता आणि काम अधिक सोपे करू शकता.