सध्या उन्हाचा कडाका सगळीकडेच खूप वाढला आहे. दिवसा तर एवढं जास्त ऊन असतं की घराबाहेर पडायलाही नकोसं होऊन जातं. घरातही पंखा, कुलर लावूनही उन्हाच्या झळा लागतातच. त्यामुळे जीव अगदी कासावीस होऊन जातो. अशावेळी जर माठातलं थंडगार पाणी प्यायला मिळालं तर उन्हाळा थोडा तरी सुसह्य होण्यास मदत होते. पण नेमकं असं होतं की ऊन जसं जसं वाढू लागतं, तसं तसं माठातलं पाणी थंड होण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. थंडगार पाणी प्यायला न मिळाल्यामुळे मग तहान भागत नाही. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा.. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास तुमच्या माठातलं पाणी नेहमीच फ्रिजच्या पाण्यासारखं थंडगार होत जाईल.(Matka Water Cooling Tips)
माठातलं पाणी थंडगार होण्यासाठी उपाय
माठातलं पाणी थंडगार होण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येईल, याविषयीची माहिती foodophile_saloni या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
फ्रिजमध्ये ठेवूनही आलं सुकून जातं? १ सोपी ट्रिक- आल्याचा सुगंध, ताजेपणा महिनाभर टिकून राहील
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की एका वाटीमध्ये १ चमचा व्हिनेगर घ्या.
त्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा बेकिंग सोडा घाला. सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यात थोडं पाणी घाला.
पाण्यात सगळे पदार्थ एकजीव झाले की हे पाणी माठामध्ये घाला आणि एखाद्या स्क्रबरने माठ घासून काढा.
महागड्या रूम फ्रेशनरची गरजच काय! १ रिकामी बाटली घेऊन फक्त १० रुपयांत घर सुगंधित करा..
यामुळे माठाची छिद्रं मोकळी होतात आणि त्यामुळे माठ थोडा पाझरून त्यातलं पाणी थंड होण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून एकदा नक्की करा.
यामुळे ऊन कितीही वाढलं तरी माठातलं पाणी मात्र नेहमीच थंडगार राहण्यास मदत होईल.