Join us

पूजेची भांडी काळी पडली-चमक उडाली? ३ सोपे उपाय, न घासता न रगडता स्वच्छ होतील भांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:02 IST

Tips And Tricks How To Clean Pooja Utensils : पूजेची भांडी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया.

पुजेची भांडी स्वच्छ ठेवणं फार महत्वाचे असते. जर भांडी  घाणेरडी असतील तर पूजा करताना ते बरोबर दिसत नाही. (Cleaning Hacks) सणासुधीला पुजेची भांडी स्वच्छ असावीत असं प्रत्येकालचा आवटंत. डिटर्जेंटने रगडून रगडून भांडी केल्यानंतरही अनेकदा फरक दिसत नाही भांडी वारंवार घासूनही चिकट, काळपट राहतात. पूजेची भांडी ऑक्सिडाईज होतात.  काही घरगुती उपाय करून तुम्ही कठीण काम सोपं करू शकता. (Home Remedies) पूजेची भांडी स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स पाहूया. ( Tips And Tricks How To Clean Pooja Utensils)

चिंचेचं पाणी

तांब्या पितळ्याच्या भांड्यांवरील काळे डाग काढून टाकण्यासाठी आणि ते साफ करण्यासाठी एका वाटीत चिंच  घ्या. त्यात कोमट पाणी घाला. चिंच वितळल्यानंतर ते हाताने दाबून घ्या. नंतर या भांड्यात इतकं पाणी घाला की भांड्यात पूर्णपणे बुडेल. १५ मिनिटं बुडवल्यानंतर भांडी स्वत:हून चमकू लागतील.

बाजारात मिळणाऱ्या पावडर

ही भांडी साफ करण्यासाठी तुम्ही बाजारातून पिंताबरी पावडर विकत घेऊ शकता. आता भांडं ओलं करा त्यानंतर एक स्कॉच ब्राईट घेऊन त्याच्या साहाय्याने भांडी स्वच्छ करून घ्या. हलक्या हातानं स्क्रब करा ज्यामुळे पुजेची भांडी चमकतील

व्हिनेगर

२ मग कोमट पाण्यात १ चमचा डिटर्जेंट पावडर घाला. त्यात अर्धा कप पांढरे व्हिनेगर घालून घोळवून घ्या. नंतर  या भांड्याला २० मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. नंतर स्कॉच ब्राईटच्या  मदतीनं स्क्रब करा. सर्व भांडी नव्यासारखी चमकतील.

मीठ आणि लिंबू

पूजेची भांडी चमकवण्यासाठी मीठ आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी एका लिंबाच्या रसात अर्धा चमचा मीठ मिसळा. त्यानंतर हे मिश्रण भांड्यांवर लावा. नंतर एकदा घासल्यानंतर पुजेची भांडी सहज स्वच्छ होतील.

बेकींग पावडर आणि डिटर्जेंटच्या मदतीने तुम्ही तांब्या आणि पितळाची भांडी चमकवू शकता. यासाठी रात्री झोपण्याआधी भांड्यात बेकींग सोडा आणि डिटर्जेंटचे मिश्रण तयार करा.  या मिश्रणात भांडी थोडावेळ भिजू द्या. त्यांतर स्क्रब  करून स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या  उपायांनी काही मिनिटांत भांडी स्वच्छ होतील.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया