Lokmat Sakhi >Social Viral > नासलेलं दूध सिंकमध्ये फेकणं पडू शकतं महागात, सिंक तुबंतं-सतत पाणी साचतं कारण..

नासलेलं दूध सिंकमध्ये फेकणं पडू शकतं महागात, सिंक तुबंतं-सतत पाणी साचतं कारण..

Spoiled milk in the sink: नासलेल्या दुधातील प्रोटीन कॅसेइन आणि फॅट जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते चिकट पदार्थाचं रूप घेतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:29 IST2025-07-14T15:15:30+5:302025-07-15T20:29:46+5:30

Spoiled milk in the sink: नासलेल्या दुधातील प्रोटीन कॅसेइन आणि फॅट जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते चिकट पदार्थाचं रूप घेतं.

Throwing spoiled milk in the sink blog the drain | नासलेलं दूध सिंकमध्ये फेकणं पडू शकतं महागात, सिंक तुबंतं-सतत पाणी साचतं कारण..

नासलेलं दूध सिंकमध्ये फेकणं पडू शकतं महागात, सिंक तुबंतं-सतत पाणी साचतं कारण..

Spoiled milk in the sink: दूध जेव्हा नासतं तेव्हा जास्तीत जास्त लोक ते किचनमधील सिंकमध्ये किंवा नालीमध्ये फेकतात. पण अनेकांना माहीत नसतं की, असं केल्यानं नाली किंवा सिंक ब्लॉक होऊ शकतं. कारण खराब झालेलं म्हणजे नासलेलं दूध नालीमध्ये अडथळा निर्माण करतं. कसं ते पाहुया

नासलेल्या दुधातील प्रोटीन कॅसेइन आणि फॅट जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते चिकट पदार्थाचं रूप घेतं. हा चिकट पदार्थ पाइपमध्ये चिकटतो आणि नंतर हळूहळू त्यावर इतरही गोष्टी चिकटतात ज्यामुळे पाइफ ब्लॉक होतो. 

त्याशिवाय अनेक घरांतील नाल्यांची स्वच्छता नियमितपणे केली जात नाही किंवा पाइप जुने किंवा गंजलेले असतात. अशात जेव्हा पुन्हा पुन्हा दूध किंवा चहासारखे डेअरी प्रॉडक्ट्स नालीत टाकात तेव्हा पाइप ब्लॉक होण्याचा धोका वाढतो.

पाइप ब्लॉक करणाऱ्या इतर गोष्टी

१) चहाचं पावडर किंवा कॉफी ग्राउंड्स

२) तेल आणि तूप

३) पीठ किंवा तांदळाचं बॅटर

४) फळं आणि भाज्यांची साली

नासलेल्या दुधाचा योग्य वापर

१) नासलेलं दूध जैविक खत बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. हे मातीत टाकल्यानं झाडांना पोषण मिळतं.

२) खराब झालेलं दूध लादी पुसण्यासाठी किंवा तांब्याची भांडी घासण्याठी वापरलं जाऊ शकतं. हे एका नॅचरल क्लीनरसारखं काम करतं.

३) जर दूध नासलं नसेल तर ते कढी किंवा पनीर बनवण्यासाठीही वापरू शकता.

४) जर दूध नासलं असेल आणि वापण्याजोगं नसेल तर ते कचऱ्यात फेका, नालीत नाही.

Web Title: Throwing spoiled milk in the sink blog the drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.