Join us

हा काय प्रकार? नवऱ्याला जेवू घालते अन् रोज वसूल करते ११५० रुपये, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 16:24 IST

महिला तिच्या पतीकडून घरच्या जेवणासाठी पैसे घेते. त्यामागील कारण जाणून घेऊया...

पती-पत्नीबद्दलच्या अनेक हटके गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. पत्नी गृहिणी असेल तर ती नेहमीच पतीसाठी दररोज सकाळी ऑफिसला नेण्यासाठी डबा किंवा जेवण बनवते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, एखादी पत्नी तिच्या पतीसाठी जेवण बनवते आणि नंतर त्यासाठी त्याच्याकडून पैसे घेते? एका महिलेने सोशल मीडियावर विचित्र ट्रेंड शेअर केला आहे. महिला तिच्या पतीकडून घरच्या जेवणासाठी पैसे घेते. त्यामागील कारण जाणून घेऊया...

'रे' असं या महिलेचं नाव असून ती दोन मुलांची आई आणि सोशल मीडिया क्रिएटर आहे. तिने तिच्या पतीसाठी टिफिन बनवायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी ती त्याच्याकडून पैसे घेते. ती दररोज १० पौंड (११५० रुपये) घेते. जर तिचा नवरा मॅकडोनाल्ड किंवा ग्रेग्स सारख्या दुकानांमध्ये दररोज इतके पैसे खर्च करू शकतो, तर मग तेच पैसे त्याने त्याच्या पत्नीला का देऊ नये, जी त्याच्यासाठी घरी खूप मेहनतीने जेवण बनवते. जर तो बाहेरच्या अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ शकतो, तर मलाही तेवढेच पैसे का मिळू नयेत? अशा प्रकारे आम्ही दोघेही आनंदी आहोत, तो जेवून आणि मी पैसे मिळवून असं महिलेने म्हटलं आहे.

न्यूयॉर्क पोस्टनुसार, रेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये ती तिच्या पतीसाठी सॅलड बनवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. काही लोकांनी रेच्या बोलण्याचं समर्थन केलं, तर अनेकांनी ते चुकीचं असल्याचं म्हटलं. एका युजरने "जर तुम्ही तुमच्या पतीवर प्रेम केलं असतं तर तुम्ही पैसे आकारले नसते" असं म्हटलं. तसेच दुसऱ्याने "घरी स्वयंपाक करणं म्हणजे पैसे वाचवणं, पण जेव्हा घरी शिजवलेल्या अन्नासाठी पैसे आकारले जातात, तेव्हा त्याचा काय फायदा?" असं म्हटलं.

काही लोकांनी या महिलेचं समर्थन करत तिला पाठींबा दिला आहे. ती बरोबर बोलत असल्याचं म्हटलं आहे. हे डील चुकीचं नाही, पत्नी मनापासून पतीसाठी जेवण बनवत असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान सवाना स्टोन हिची देखील चर्चा रंगली आहे. ती टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर तिच्या आयुष्याशी निगडीत गोष्टी शेअर करत असते. तिने लग्नाआधीच गृहिणी होण्याचा निर्णय घेतला, कारण तिला घरी राहून पती आणि मुलांची काळजी घ्यायची आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्न