Join us

करावे तसे भरावे! मोबाईल चोरून पळत होता अन् रस्त्यातच फळ मिळालं, घडलं असं काही.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 14:38 IST

Thief steal mobile from hand of a man : या व्हिडिओत तरूणाला गंभीर स्वरूपात मार लागतो.

चोरीच्या घटना वारंवार समोर येत असतात. अनेकदा चोर आपल्या अतरंगी वागण्यामुळे चर्चेचे कारण ठरतात. अनेकदा लोक आणि पोलिस संभ्रमात पडतात तर कधी दुर्घटनाही घडतात. अशीच एक चोरीची घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करून पळाल्यानंतर रस्त्यात त्याचा अपघात होतो. व्हिडिओमध्ये पाहिल्यास लक्षात येईल की या व्हिडिओत तरूणाला गंभीर स्वरूपात मार लागतो. (Thief steal mobile from hand of a man then he fell down on raod accident viral video)

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चोरट्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पळ काढल्याचे दिसत आहे. पण दुसऱ्याच क्षणी त्याला 'कर्माचे फळ' मिळाले. हे फळ मिळण्यात चोराचा काहीही दोष नसला तरी त्याला फार मार लागला. रस्त्याने धावत असताना त्याची एका कारला धडक बसली.

पोट, मांड्याचा आकार कमीच होत नाहीये? ४ उपाय, कायम स्लिम अ‍ॅण्ड फिट दिसाल

कारला धडकल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर एक व्यक्ती आरामात मोबाईल चालवत असताना हा सर्व प्रकार घडला. दरम्यान, पाठीमागून एक चोरटा येऊन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळू लागला. हे पाहून ती व्यक्तीही त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू लागली.

५७ व्या वर्षी सुपरफिट दिसणारा मिलिंद सोमण खातो तरी काय? सिम्पल 'डाएट प्लॅन'ची कमाल..

पुढच्याच क्षणी चोरट्याला रस्त्यावरून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आणि तो गंभीर जखमी झाला. चोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया