Join us

मोबाइलवर पैसे ट्रान्सफर करुन स्कॅम करणाऱ्यालाच तरुणीने शिकवला धडा, त्यानेच लावला डोक्याला हात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2025 15:25 IST

The young woman taught a lesson to the person who was trying to scam her : स्कॅमरवरच उलटला त्याचा डाव. पाहा काय केले या तरुणीने. चांगलाच धडा शिकवला.

सायबर क्राइमचे प्रमाण आजकाल प्रचंड वाढले आहे. तसेच हॅकींगचे प्रमाणही फार वाढले आहे. टेक्नॉलॉजीच्या मदतीने कोणाचीही माहिती मिळवणे आता सोपे झाले आहे. अनेक अशा तक्रारी आजकाल नोंदवल्या जातात. आजकाल नेट बँकींग तसेच ऑनलाइन मनी ट्रान्सपर अगदी सहज शक्य होते. कोणीही कोठेही बसून एखाद्याला पैसे पाठवते किंवा एखाद्याकडून पैसे मागते या कृती अगदीच सहज करतात येतात. नेट बँकींग नक्कीच सोयीचे आहे.त्यामुळे काम अगदी सोपे होते.

मात्र ऑनलाइन सिस्टीमबरोबर स्कॅम्सचे प्रमाणही वाढले आहे. आपण सारख्या स्कॅमर्सपासून सावध राहा आशा बातम्या ऐकत असतो. तरीही अनेक जण त्यांना बळी पडतातच. त्यांना शोधून काढणेही फार सोपे नसते. सिस्टिमचा वापर करुन लोकांना शेंड्या लावण्यामध्ये हे स्कॅमर्स अगदी पटाईत असतात. सध्या एका मुलीचा व्हिडीओ फार व्हायरल होत आहे. या मुलीने तिच्यासोबत फ्रॉड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्कॅमरबरोबरच स्कॅम केला. लोकांनी तिचे फारच कौतुक केले आहे. पाहा नक्की काय प्रकार घडला.

घरके कलेश नावाच्या चॅनलने या मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये ती एका स्कॅमर बरोबरचा संवाद साधताना दिसली. एका स्कॅमरने तिला तो तिच्या वडीलांचा मित्र असल्याचे सांगितले. त्या क्षणीच मुलीला हा स्पॅम कॉल आहे हे कळून चुकले होते. पण तिने फोन कट केला नाही तर त्याचे म्हणणे पूर्ण ऐकले. स्कॅमरने मुलीला तिच्या वडिलांनी पैसे पाठवायला सांगितले आहेत असे सांगून पैसे पाठवल्याचा खोटा एसएमएस केला. वडिलांनी १२००० रुपये पाठवायला सांगितले होते मात्र चुकून २०००० सेंड झाल्याचे स्कॅमर म्हणाला. त्याने खोटा मेसेजही पाठवला. मग मुलीला म्हणाला की वरचे पैसे मला परत पाठव. त्या मुलीने स्कॅमरचाच मेसेज त्याला कॉपी पेस्ट करुन पाठवला. 

हा सगळा प्रकार झाल्यानंतर स्कॅमरला कळले की ही काही आपल्याला पैसे पाठवणार नाही. आश्चर्य म्हणजे स्कॅमरने 'मान गये आपको' असं म्हणत त्या मुलीचे कौतुक केले. तुम्हालाही असे फोन मेसेज आले असतील तर अजिबात बळी पडून नका. गेलेले पैसे पुन्हा मिळतील याची खात्री नाही. सायबर क्राइम ब्रॅन्चला लगेच अपडेट करा. असे स्पॅम कॉल्स ओळखता येणे गरजेचे आहे.    

टॅग्स :पैसाऑनलाइनसोशल व्हायरलसायबर क्राइम