lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > नवरीने ट्रॅक्टरवर बसून अशी ठसक्यात घेतली मंडपात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

नवरीने ट्रॅक्टरवर बसून अशी ठसक्यात घेतली मंडपात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

नववधूच्या वेशात गॉगल घालून घेतली ट्रॅक्टरवरुन ढासू एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2022 03:23 PM2022-05-29T15:23:42+5:302022-05-29T15:31:56+5:30

नववधूच्या वेशात गॉगल घालून घेतली ट्रॅक्टरवरुन ढासू एन्ट्री

The bride entered the tent of marriage on a tractor and entered the tent. The video went viral | नवरीने ट्रॅक्टरवर बसून अशी ठसक्यात घेतली मंडपात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

नवरीने ट्रॅक्टरवर बसून अशी ठसक्यात घेतली मंडपात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

Highlightsलग्नात डोली किंवा कारने एन्ट्री घ्यायचा ट्रेंड आात बराच जुना झाला आहे, त्यामुळे नवरी मुलीने घेतली थेट ट्रॅक्टरवरुन एन्ट्रीधाडसाचे कौतुकच, लग्नाच्या मंडपात ती थेट पोहोचली ट्रॅक्टरवरुन, तेही स्वत:चालवत

सध्या लग्नसराई सुरू असून आपलं लग्न खास व्हावं यासाठी प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न करताना दिसतो. आपलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं यासाठी दोघेही हा प्रयत्न करताना दिसतात. नवरीला मंडपात आणण्यासाठी कधी डोलीचा वापर केला जातो तर कधी हेलिकॉप्टरमधून या नवरीची मंडपात एन्ट्री होताना दिसते. ही एन्ट्री नेहमीच खास असल्याने उपस्थितांचे नवरीच्या येण्याकडे लक्ष लागलेले असते. आता हे सगळे ठिक आहे. पण एका नवरीने तर थेट ट्रॅक्टरवरुनच शेतात ए्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ही नवरी चक्क ट्रॅक्टर चालवत होती. ही घटना मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील असून मुलीच्या या एन्ट्रीमुळे सगळेच अवाक झाले.

नवरीने इतक्या ठसक्यात एन्ट्री घेतल्याने उपस्थितांमध्ये याविषयी चर्चा झाली. तर सोशल मीडियावरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वासू कवडकार या व्यक्तीचे लग्न भारती तागडे हिच्याशी ठरले. वासु लग्नमंडपात पोहोचल्यानंतर नवऱ्या मुलीची वाट पाहत होता. त्यावेळी अचानक या मुलीने फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून एन्ट्री घेतली. यावेळी ही नवरी स्वत: ट्रॅक्टर चालवत होती तर तिचे भाऊ तिच्या बाजूला बसले होते. नवऱ्या मुलीला ट्रॅ्क्टर चालवताना पाहून उपस्थितांना अतिशय आश्चर्य वाटले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नवऱ्या मुलीचे स्वागत केले. विशेष म्हणजे तिला ट्रॅक्टर चालवता येतो हे पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. तिही अतिशय सराईतपणे इतका मोठा ट्रॅक्टर बिनधास्त चालवत असल्याचे दिसते. 

या एन्ट्रीबाबत या नवरीने सांगितले, की ती एका शेतकऱ्याची मुलगी आणि आणि आताही शेतकऱ्याची सून होणार आहे. हे लक्षात घेऊन आपण मुद्दाम ट्रॅक्टरवरुन एन्ट्री घेतली. या लग्नाला आलेला प्रत्येक व्यक्ती तिच्या एन्ट्रीचे कौतुक करत होता. लग्नात डोली किंवा कारने एन्ट्री घ्यायचा ट्रेंड आात बराच जुना झाला आहे. त्यामुळे आपण काहीतरी नवीन करायचे ठरवले आणि अशाप्रकारे खास एन्ट्री घेतली. ही एन्ट्री सगळ्यापेक्षा वेगळी आणि खास ठरल्याने आपला निर्णय योग्य ठरला असेही ती पुढे म्हणाली. ट्रॅक्टरवरुन येणाऱ्या भारती हिने लाल रंगाचा लग्नासाठी लेहंगा घातला असून छानसा मेकअपही केला आहे. एन्ट्री घेताना तिने डोळ्यांवर गॉगल लावल्याने तिचा बोल्डपणा दिसून आला.  

Web Title: The bride entered the tent of marriage on a tractor and entered the tent. The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.