Join us

भर लग्नात वरवधू झाले रोमॅण्टिक आणि लाजले वऱ्हाडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 15:14 IST

Viral Video Social Media लग्नात गमतीजमती होतातच, पण हा रोमॅण्टिक व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडियातही चर्चा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्न समारंभ असो, किंवा लग्नाची पत्रिका जरा काही हटके कंटेंट पाहायला मिळाला की व्हिडिओ व्हायरल होतोच. कधी कधी लग्नमंडपात वधू वर आपल्या डान्सच्या शैलीने लोकांचे मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. तर कधी नातेवाईकांचा अतरंगी डान्स सोशल मीडियात सगळ्यांना हसवतात. असाच एक लग्नमंडपातील व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वराने वधूला मंगळसूत्र घालत असताना असं काही केलं, की सगळेच अचंबित झालेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.

भरमंडपात वधू-वर झाले रोमॅण्टिक

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वधू - वर लग्नाच्या संबंधित विधी पार पाडत आहे. यात वर वधूला मंगळसूत्र घालत आहे. मंगळसूत्र घालत असताना वर रोमँटिक होतो आणि सगळ्यांसमोर वधूचे चुंबन घेतो. जोडपे तर जोडपे पण वऱ्हाडीही लाजून चूर होतात. भर लग्नातला हा रोमान्स पाहत सोशल मीडियातही त्यामुळे त्याची चर्चा रंगणं साहजिकच आहे.

टॅग्स :लग्नसोशल मीडियासोशल व्हायरल