Join us

'आत्ताच्या आता नोकरीवरून काढा'; शिक्षिकेला भोजपुरी गाण्यावर डान्स केला तर लोक का चिडले? व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:51 IST

Teacher Dances to Bhojpuri Song With Students : भोेजपूरी गाण्यावर नृत्य केले म्हणून एक शिक्षिका ट्रो झाली.

शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ही शिक्षिका एका भोजपुरी गाण्यावर नाचताना दिसत आहे. समोर विद्यार्थीही असतात. (Teacher dances to bhojpuri song with students) हा व्हिडिओ नेटिझन्सना अजिबात आवडलेला नाही. विद्यार्थ्यांसोबत डान्स व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल शिक्षिकेला ट्रोल केले जात आहे. (Teacher dances to bhojpuri song with students in classroom please suspend her says internet)

वर्गात एक शिक्षिका भोजपुरी गाणं ''पतली कमरिया मोरी'' वर नाचताना पाहू शकता. त्यानंतर, कॅमेरा त्या विद्यार्थ्यांकडे वळतो. त्याच्या व्हिडिओमुळे अनेक ट्विटर युजर्स नाराज झाले. काहींनी तर शिक्षिकेला निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. कारण हे वर्गाच्या शिष्टाचाराच्या विरोधात आहे असं म्हटलं.  जिंदगी गुलजार है नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

एका युजरने लिहिले, “या महिलेला तात्काळ पदावरून काढून टाकले पाहिजे. त्या अश्लिल डान्स करत आहेत आणि त्यात लहान मुलंही समोर आहेत.  हे खूपच लाजिरवाणे आहे,” “हे चांगल्या शिक्षिकेसाठी आदर्श नाही. गुरूंबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि मुलांना देखील शिकवणे आवश्यक आहे,” असे दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया