Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > बापरे फ्रिजचाही स्फोट होऊ शकतो? नियमित काळजी घ्या नाही तर जीवावर बेतेल , फ्रिज 'असा' ठेवा मेनटेंन

बापरे फ्रिजचाही स्फोट होऊ शकतो? नियमित काळजी घ्या नाही तर जीवावर बेतेल , फ्रिज 'असा' ठेवा मेनटेंन

Take regular care of fridge or it will cost you your life, keep the fridge properly maintained : फ्रिजची काळजी घ्या. काही कारणांमुळे तो फुटूही शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2026 15:32 IST2026-01-11T15:31:15+5:302026-01-11T15:32:46+5:30

Take regular care of fridge or it will cost you your life, keep the fridge properly maintained : फ्रिजची काळजी घ्या. काही कारणांमुळे तो फुटूही शकतो.

Take regular care of fridge or it will cost you your life, keep the fridge properly maintained | बापरे फ्रिजचाही स्फोट होऊ शकतो? नियमित काळजी घ्या नाही तर जीवावर बेतेल , फ्रिज 'असा' ठेवा मेनटेंन

बापरे फ्रिजचाही स्फोट होऊ शकतो? नियमित काळजी घ्या नाही तर जीवावर बेतेल , फ्रिज 'असा' ठेवा मेनटेंन

इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना कायमच सतर्क राहा असा इशारा सगळेच देत असतात. अर्थात त्याचे गांभिर्य सगळ्यांनाच पटकन कळत नाही. काही होत नाही चालतं असं म्हणून आपण टाळाटाळ करत असतो. मात्र या वस्तूंची काळजी घेणे त्यांचा मेंटेनंस फार गरजेचा असतो. (Take regular care of fridge or it will cost you your life, keep the fridge properly maintained)अगदी लहान दिव्यापासून टीव्हीपर्यंत सगळ्याचीच काळजी घेणे गरजेचे असते. मुंबईत घडलेल्या एका भयंकर घटने नंतर सगळेच हादरले आहेत. मध्य रात्री एका घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे घराला आग लागली आणि त्या आगीत घरातील ३ सदस्यांचा मृत्यू झाला. फ्रिजही असा फुटू शकतो यावर अनेकांना विश्वासच बसत नव्हता. अशा घटना टाळण्यासाठी पाहा काय करायला हवे. 

१. फ्रिज नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावा. भिंतीला अगदी चिकटून फ्रिज ठेवल्यास मागील बाजूला उष्णता साचते आणि मोटरवर ताण येतो. भिंत आणि फ्रिजमध्ये थोडी मोकळी जागा ठेवली तर उष्णता बाहेर पडण्यास मदत होते. तसेच थेट उन्हात किंवा गॅस शेगडीजवळ फ्रिज ठेवणे टाळावे.

२. फ्रिजमध्ये गरम अन्न थेट ठेवू नये. गरम पदार्थ ठेवल्यास आतले तापमान अचानक वाढते आणि कंप्रेसरवर जास्त ताण येतो. यामुळे फ्रिज खराब होण्याची किंवा शॉर्ट सर्किटची शक्यता वाढते. अन्न नेहमी थंड झाल्यावरच फ्रिजमध्ये ठेवावे. तसेच फ्रिज जास्त भरुन ठेवू नये, कारण हवा खेळती राहिली नाही तर थंडावा योग्य पद्धतीने पसरत नाही.

३. फ्रिजचा दरवाजा वारंवार आणि जास्त वेळ उघडे ठेवणे टाळावे. यामुळे आत उष्ण हवा जाते आणि फ्रिज जास्त तापतो. परिणामी वीजखर्च वाढतो आणि मोटर गरम होऊ शकते. दरवाज्याची रबर गॅस्केट वेळोवेळी तपासावी. ती सैल किंवा फाटलेली असल्यास थंड हवा बाहेर जाते आणि फ्रिजवर ताण येतो.

४. वीजपुरवठ्याच्या बाबतीतही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. फ्रिजसाठी स्वतंत्र सॉकेट वापरावे आणि जास्त एक्स्टेन्शन बोर्ड किंवा ढिले प्लग वापरणे टाळावे. व्होल्टेजमध्ये चढउतार होत असतील तर स्टॅबिलायझरचा वापर करावा. वीजतार तुटलेली किंवा गरम होत असल्यास त्वरित बदलावी, कारण शॉर्ट सर्किटमुळे आग किंवा स्फोटाचा धोका निर्माण होऊ शकतो.

५. फ्रिजमध्ये ज्वलनशील पदार्थ, जसे की अल्कोहोल, केमिकल्स किंवा एरोसोल स्प्रे कधीही ठेवू नयेत. काही बंद बाटल्यांमध्ये गॅस तयार होऊ शकतो आणि थंड वातावरणात दाब वाढल्याने स्फोटाचा धोका निर्माण होतो. खराब झालेली, फुगलेली भांडी किंवा बाटल्या त्वरित बाहेर काढाव्यात.

६. नियमित स्वच्छता आणि सर्व्हिसिंग फ्रिजसाठी अत्यंत गरजेचे आहे. मागील बाजूची कॉईल धूळमुक्त ठेवावी, कारण धूळ साचल्यास उष्णता बाहेर पडत नाही. फ्रिजमधील बर्फ जास्त साचू देऊ नये. वेळोवेळी डीफ्रॉस्ट केल्यास फ्रिज सुरळीत चालतो आणि सुरक्षित राहतो. दर दोन महिन्यांतून एकदा फ्रिज नीट तपासावा. काही वेगळे दिसले तर लगेच बदलून घ्यावे. 
 

Web Title : फ्रिज में भी हो सकता है विस्फोट: नियमित रखरखाव से बचें घातक दुर्घटनाएँ।

Web Summary : खराब रखरखाव के कारण फ्रिज में विस्फोट हो सकता है। इसे हवादार रखें, ओवरलोडिंग से बचें और उचित वोल्टेज सुनिश्चित करें। ज्वलनशील पदार्थ न रखें। सुरक्षा और दीर्घायु के लिए नियमित सफाई और डीफ्रॉस्टिंग महत्वपूर्ण है।

Web Title : Fridge explosions possible: Maintain regularly to prevent fatal accidents.

Web Summary : Fridge explosions can occur due to poor maintenance. Keep it ventilated, avoid overloading, and ensure proper voltage. Don't store flammables. Regular cleaning and defrosting are crucial for safety and longevity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.