१९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली पिढी ही जेन झी म्हणून ओळखली जाते. टेक्नोलॉजी, नव्या गोष्टी शिकणे या बाबतीत जेन झी अतिशय पुढे आहे. स्मार्ट पिढी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं. कमीतकमी वेळात स्मार्ट पद्धतीने अधिक चांगलं काम कसं करायचं हे त्यांना बरोबर ठाऊक आहे, असं मानलं जातं. पण असे सगळे गुण या पिढीमध्ये असले तरी त्यांच्या कामाच्या बाबतीत एक वेगळाच अहवाल समोर आला आहे. त्यानुसार काही कारणांमुळे कित्येक मोठ्या कंपन्या जेन झी जनरेशनच्या लोकांना कामावरून कमी करत आहेत. यामागे नेमकी कारणं काय असावीत बरं?
इंटेलिजंट डॉट कॉम या संस्थेतर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये जेन झी बाबत एक अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये असं दिसून आलं की जवळपास ६० टक्के एचआर मॅनेजरने त्यांच्या कंपनीमधील जेन झी कर्मचाऱ्यांना इतर लोकांच्या तुलनेत खूप लवकर कामावरून काढून टाकलं आहे.
यामध्ये एकूण १ हजार हायरिंग मॅनेजर सहभागी झाले होते आणि त्यापैकी दर ६ मॅनेजर नंतर एकाचं असं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये जेन झी लोकांना घ्यायचंच नाहीये.
कारण या लोकांमध्ये कम्युनिकेशन स्किल, मोटीव्हेशन आणि प्रोफेशनल वागण्याची खूप कमतरता दिसून येते. काही अधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे या लोकांना वर्क प्रेशर व्यवस्थित सांभाळता येत नाही. ते लगेच डिप्रेशनमध्ये जातात किंवा हायपर होतात.
पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब
त्यांना सोपविण्यात आलेल्या कामाची लवकर सुरुवात ते करत नाहीत शिवाय फिडबॅक देण्यातही ते खूप कमी पडतात. आपल्या वर्क कल्चरमध्ये ते लवकर ॲडजस्ट होत नाहीत, असंही काही जणांचं म्हणणं आहे. या सगळ्या कारणांमुळे जेन झी ला कामावरून कमी करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, असं या अहवालातून समोर आलं आहे. ResumeBuilder.com यांनीही याबाबतीत सर्व्हे केला होता. थोड्याफार फरकाने त्यांचीही जेन झी बाबतची मतं अशीच असल्याचं लक्षात येतं.
