नोकरी आणि घर सांभाळून दमलेल्या आईची गोष्ट, वाटत नाही एनर्जेटिक! ही घ्या मॅजिक ट्रिक-वाटेल फ्रेश आणि फिट
Updated:January 21, 2026 16:47 IST2026-01-21T14:31:48+5:302026-01-21T16:47:29+5:30

वर्किंग वुमनचा दिवस म्हणजे सतत डोक्यामध्ये कामांच्या यादीचा गोंगाट. एकानंतर एक यापद्धतीने त्यांचं शरीर आणि मेंदू सतत काम करत असतं.(5 health tips for working women)
अशावेळी खरोखर स्वत:साठी वेळ काढून व्यायाम वगैरे करणं किंवा स्वत:च्या फिटनेससाठी खूप वेळ देणं त्यांना जमण्यासारखं नसतं.(health and fitness tips for working women)
म्हणूनच डॉक्टरांनी वर्किंग वुमनसाठी काही साध्या सोप्या हेल्थ टिप्स दिल्या आहेत. जेणेकरून त्यांचा फिटनेस टिकून राहण्यास मदत होईल. वाढत्या वयासोबत शरीर थकणार नाही आणि खूप सक्षमपणे त्या दिवसभरातली त्यांची कामं करू शकतील. यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयीची माहिती डॉक्टरांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(5 simple rules to keep yourself feet and active)
यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळच्या नाश्त्याकडे लक्ष द्या. तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर जास्त प्रमाणात घ्या. कारण यामुळे तुम्हाला भरपूर उर्जा मिळेल. शरीराचं कुपोषण होणार नाही.
प्रोटीन शेक किंवा भाज्यांची स्मूदी, फळं हे पदार्थ तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये असायलाच हवेत. कारण प्रोटीन्स आणि फायबरच्या कमतरतेमुळे शरीर लवकर थकायला सुरुवात होते.
तुम्हाला व्यायामाला खूप वेळ देणं शक्य होत नाही हे खरं आहे. त्यामुळे जो काही १० ते १५ मिनिटांचा वेळ मिळेल तो स्क्रिन पाहण्यापेक्षा वॉकिंग करण्यावर किंवा घरच्याघरी सुर्यनमस्कार, स्ट्रेचिंग यासारखे काही व्यायाम करण्यावर घालवा. यामुळे थोडा फार तरी व्यायाम होईल. शरीर ॲक्टीव्ह राहण्यास, फिट राहण्यास मदत होईल.
तिशी, पस्तिशीनंतर शरीराला काही सप्लिमेंट्सची गरज असते. त्यामुळे या वयात आहारतज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुमच्या शरीराला ज्या घटकांची गरज आहे, त्यांच्या सप्लिमेंट्स सुरू करा. बहुतांश महिलांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी ३, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक अशा घटकांची कमतरता असते. त्याचा एनर्जीवर खूप परिणाम होतो. त्यामुळे या वयात सप्लिमेंट्स घेणं गरजेचं असतं.
मल्टीटास्किंग ही तुमची सवय असली तरी ती कमी करा. कारण त्यामध्ये तुम्ही खूप थकून जाता. एकावेळी एकच काम करा. जे होत नाही, ते ओढून ताणून करून तुमची एनर्जी वाया घालवू नका. सगळं काही सांभाळण्याच्या नादात मनावरचा, शरीरावरचा ताण वाढतो आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.