Join us

दरवर्षी नवा माठ कशाला? जुन्या माठातलं पाणीही होईल फ्रिजसारखं थंडगार- बघा आजीने सांगितलेला उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2024 14:02 IST

How To Reuse Old Math Or Matka For Cool Water: जुन्या माठातलं पाणी थंड होत नाही, असं वाटून दरवर्षी नवा माठ आणत असाल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (Summer Special)

ठळक मुद्देजुन्या माठातलं पाणी थंडगार करायचं असेल तर तो कशा पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी तयार करावा, याचा हा सोपा उपाय एकदा बघा.

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवण येते ती माठातल्या थंडगार पाण्याची. एरवी वर्षभर बरेच जण माठ वापरत नाहीत. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच मात्र हमखास माठ विकत आणला जातो. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असं आढळून येतं की ते दरवर्षी उन्हाळ्यात नवा माठ आणतात. मग भलेही त्यांचा मागच्या वर्षीचा माठ चांगल्या अवस्थेत असला तरी नवा माठ आणला जातो. याचं कारण एकच असतं की जुन्या माठातलं पाणी थंडगार होत नाही. पण खरंच असं असतं का? जुन्या माठातलं पाणी थंडगार करायचं असेल तर तो कशा पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी तयार करावा, याचा हा सोपा उपाय एकदा बघा. (how to reuse old math or matka for making water cool in summer?) 

जुन्या माठातलं पाणी थंड व्हावं यासाठी उपाय

काही साध्या- सोप्या गोष्टी केल्या तर जुन्या माठातलं पाणीही अगदी थंडगार होऊ शकतं. यासाठी नेमके काय उपाय करावे, याची माहिती 'आपली आजी' या यु-ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

टी शर्टचा गळा, बाह्या सैल पडल्या? १ सोपी ट्रिक- टी शर्टला मिळेल नव्यासारखी फिटिंग

यामध्ये सगळ्यात आधी सांगितलेला उपाय म्हणजे जुन्या माठाची छिद्रे किंवा पोअर्स व्यवस्थित ओपन केले तर जुना माठही पाण्याला अगदी थंडगार करू शकतो.

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

यासाठी सगळ्यात आधी जुना माठ पाण्याने आतून बाहेरून हाताने स्वच्छ चोळून घ्या. माठ चांगला ओलसर झाला की एखादी घासणी घेऊन तो आतून- बाहेरून घासून काढा. त्या घासणीला कुठेही साबण लागलेली नको.

 

यानंतर माठामध्ये एक वाटी मीठ टाका आणि त्यात तांब्याभर पाणी ओता. आता हे मिठाचं पाणी माठाच्या आतून सगळीकडे लागेल अशा पद्धतीने माठ आतून घासून घ्या. १- २ तास मीठाचं पाणी तसंच माठात राहू द्या.

सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

त्यानंतर पुन्हा एकदा माठ स्वच्छ धुवून घ्या आणि तो माठ बुडेल अशा एखाद्या पातेल्यात, टबमध्ये किंवा पिपामध्ये ५ ते ६ तास बुडवून ठेवा. यानंतर तो माठ पुन्हा स्वच्छ धुवा आणि भरून ठेवा. या माठाभोवती एखादा कॉटनचा ओला कपडा गुंडाळून ठेवा. माठातलं पाणी नक्कीच अगदी थंडगार होईल.

 

टॅग्स :सोशल व्हायरलसमर स्पेशलपाणी