Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

Immunity Booster Remedies By Sadguru Jaggi Vasudev: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मुलांना किंवा तुम्हाला वारंवार आजारपण येत असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to boost immunity)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2024 12:35 PM2024-04-03T12:35:40+5:302024-04-03T12:36:30+5:30

Immunity Booster Remedies By Sadguru Jaggi Vasudev: रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने मुलांना किंवा तुम्हाला वारंवार आजारपण येत असल्यास हा एक सोपा उपाय करून पाहा. (How to boost immunity)

How to boost immunity, immunity booster remedies by sadguru jaggi vasudev, use of amla or gooseberry for immunity | सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

सारखं आजारी पडता? सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय

Highlightsहे मिश्रण दररोज चमचाभर खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फायदा होतो, असं सद्गुरू सांगतात. 

रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर आरोग्य ठणठणीत राहातं. कारण हल्ली व्हायरल आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आपली इम्युनिटी कमी असेल तर आपण लवकर त्या आजारांना बळी पडतो. व्हायरल त्रास घरात एकदा एका व्यक्तीला सुरू झाला की तो हळूहळू घरातल्या सगळ्यांनाच होऊ लागतो. आपलं स्वत:चं आणि घरातल्या सगळ्यांचं आजारपण निस्तरताना मग खूप दमछाक होऊन जाते. शिवाय त्यामुळे जो शारिरीक त्रास होतो, तो वेगळाच. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे (How to boost immunity), हाच त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आणि त्यासाठीच काय करायचं याचा सोपा उपाय सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितला आहे.(Immunity Booster Remedies By Sadguru Jaggi Vasudev)

 

सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग matandladle या इन्स्टाग्राम पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ते नेमका काय उपाय करतात, याविषयी सांगत आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री सांगते कैरी घालून ठेचा करण्याची उन्हाळा स्पेशल रेसिपी- करून बघा झणझणीत बेत

त्यांनी सांगितलेला उपाय अतिशय सोपा असून प्रत्येकालाच तो सहजपणे जमू शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवळे, मध आणि मिरेपूड लागणार आहे. सगळ्यात आधी आवळे काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पुसून कोरडे करून घ्या. 

 

यानंतर बिया काढून टाका आणि आवळ्याचे छोटे छोटे काप करा. आवळ्याचे तुकडे एका भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये थोडा मध टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. सगळ्या आवळ्याच्या तुकड्यांना व्यवस्थित मध लागेल, साधारण एवढं मधाचं प्रमाण असावं.

टी शर्टचा गळा, बाह्या सैल पडल्या? १ सोपी ट्रिक- टी शर्टला मिळेल नव्यासारखी फिटिंग

आवळा आणि मधाचं हे मिश्रण रात्रभर किंवा ७ ते ८ तास झाकून ठेवा. त्यानंतर त्यामध्ये थोडी मिरेपूड टाका आणि हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवल्यास महिनाभर तरी हे मिश्रण चांगले राहाते. हे मिश्रण दररोज चमचाभर खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फायदा होतो, असं सद्गुरू सांगतात. 

 

Web Title: How to boost immunity, immunity booster remedies by sadguru jaggi vasudev, use of amla or gooseberry for immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.