घरात सतत घाण झाल्यामुळे झुरळं पसरतात. रात्रीच्या वेळेस ही बारीक झुरळं किचनमध्ये जास्त प्रमाणात होतात. झुरळांना पळवण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे लावण्यापेक्षा तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. अगदी कमीत कमी खर्चात सोपे उपाय तुम्हाला सहज करता येतील (How To Get Rid Of Cockroaches Naturally). घरात खरकटं अन्न, उष्टी ताट, अन्नाचे बारीक कण अजिबात साचू देऊ नका. यामुळे झुरळं जास्त प्रमाणात येतात. (Suman Dhamne Shared Secret Tricks To Get Rid Of Cockroaches Naturally)
कडुनिंबाची पानं
कडुनिंबाची पानं एक नैसर्गिक किटकनाशक आहे. याचा कडवटपणा झुरळांना अजिबात आवडत नाही. कडुनिंब वाटून पाण्यात मिसळून याचा स्प्रे तयार करा. ज्या ठिकाणी झुरळं दिसतात त्या ठिकाणी हा स्प्रे लावा. तुम्ही कडुलिंबाची सुकी पावडरही घालू शकता. ज्यामुळे झुरळं कमी होतील.
बोरीक एसिड
बोरीक एसिड एक परीणामकारक उपाय आहे. ज्यामुळे घरातून कीटक दूर ठेवता येता. तुम्हाला जिथेही झुरळं दिसत असतील तिथे थोडी बोरीक एसिड पावडर घाला. याचा वापर करताना १ लक्षात घ्या की खाण्यापिण्याचे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा. लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांनाही दूर ठेवा.
साखर आणि बेकिंग सोडा
झुरळांना पळवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे बेकींग सोडा. झुरळांसाठी बेकिंग सोडा विषाप्रमाणे काम करतो. ज्यामुळे मुंग्या आकर्षीत होतात. १ चमचा साखरेत २ चमचा बेकींग सोडा मिसळा. हे मिश्रण कोणत्याही वाटीत किंवा छोट्या झाकणात भरून अशा ठिकाणी ठेवा जिथे झुरळं येतात. साखर खाण्याच्या लालसेनं बेकींग सोडा खाल्ल्यानं झुरळं आपोआप कमी होतील.
तमालपत्र
तपालपत्राला सुगंध तीव्र असतो. हा तीव्र वास झुरळांना अजिबात सहन होत नाही. तमालपत्र हातानं चुरून त्याचे लहान लहान तुकडे करून तुम्ही घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. ज्यामुळं झुरळं आपोआप कमी होतील.
लसणाचा परीणाम
लसणाचा तीव्र सुगंध झुरळांना आवडत नाही. लसणाच्या काही पाकळ्या घराच्या कोपऱ्यांवर, खिडकीजवळ ठेवल्यास झुरळं आपोआप कमी होतील. लसूण बारीक करून त्याचा स्प्रे सुद्धा तु्म्ही वापरू शकता. युट्यूबर आजी सुमन धामणे यांनी हे प्रभावी उपाय व्हिडिओद्वारे सगळ्यांना सांगितले आहेत.
