Join us

आई जागीच बेशुद्ध-वडिलांना अश्रू अनावर, लेकीला युपीएससी परीक्षेला उशीर झाला आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 17:11 IST

Denied Entry For Arriving Late Viral Video : विद्यार्थीनी परिक्षा केंद्राच्या बाहेर आपल्या आई-वडिलांना समजावत आहे.

रविवारी युपीएसची (UPSC) परिक्षेच्या प्रारंभिक टप्प्यातील परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. भारतभरातील परिक्षा केंद्रांवर लाखो विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी पोहोचले होते. गुरूग्राम येथील युपीएससी परिक्षा केंद्रात एका तरुणीला उशीरा आल्यामुळे परवागनी नाकारण्यात आली आणि तिला परिक्षेला बसू दिले नाही. (Viral Video)  या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्या मुलीच्या आई वडिलांच्या डोळ्यातील वेदना स्पष्ट दिसून येत आहेत. (Denied Entry For Arriving Late parents Of UPSC Aspirant Break Down)

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे

या व्हिडिओमध्ये सदर विद्यार्थीनीची आई बेशुद्ध झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थीनी परिक्षा केंद्राच्या बाहेर आपल्या आई-वडिलांना समजावत आहे. ''पप्पा-पानी पिओ!  ऐसा क्या कर रहे हो, हम अगली बार एक्झाम देंगें,'' असं  ती तिच्या वडीलांना म्हणते. मुलीची एक वर्षाची मेहनत वाया गेल्याचे दु:ख वडीलांना अजिबातच सहत होत नाही. मुलगी वडीलांना समजावून सांगते की काही नाही पन्हा परिक्षा देऊ. रागाच्या भरात असलेले वडील अधिकाऱ्यांना काहीही बोलतात. आई बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत असते आणि मुलगी आणि वडील तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. 

साक्षी नावाच्या युजरने सोशल मीडियावर हा व्हिडिओ  शेअर केला आहे. या व्हिडिओला  हृदयद्रावक व्हिडिओ असे कॅप्शन देण्यात आले आहे.  या परिक्षेसाठी आईवडीलांसोबत आलेल्या एका विद्यार्थीनीला उशीरा आल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. परिक्षा सकाळी  साडे नऊ वाजता सुरू होणार होती आणि ते 9 वाजता गेटवर होते. पण गुरूग्रामच्या एसडी आदर्श विद्यालयात  प्राचार्यांनी तिला आत जाऊ दिले नाही. 

वॉक करता तरी वजन कमी होईना? १ किलो घटवण्यासाठी किती चालायचं पाहा-पटकन बारीक व्हाल

रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाख 57 हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. युजर्स या घटनेवर दु:ख व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये आपले अनुभव शेअर केले आहेत. एका युजरने मुलांच्या मेहनीवर पाणी फिरत असल्याने खेद व्यक्त केला आहे. 

टॅग्स :सामाजिकसोशल व्हायरल