Join us

चालत्या स्कूल बसमधून बालवाडीतली मुलगी रस्त्यावर पडली, व्हिडिओ पाहून अंगावर काटाच येईल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 16:02 IST

Student Falls From School Bus : व्हिडिओमध्ये फैजा नावाची विद्यार्थिनी घरी परतत असताना शाळेच्या बसच्या आपत्कालीन दरवाजातून पडताना दिसत आहे. हा अपघात आजूबाजूच्या स्थानिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ इतर वाहनांना थांबण्यास सांगितले आणि मुलाला वाचवले.

कित्येक पालक आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी बस किंवा रिक्षाची निवड करतात. एकदा स्कूलमध्ये मुलांना सोडलं की पालकही निश्चिंत असतात. पण कधी कधी  बस दुर्घटनेत निष्पाप मुलांना आपला जीवही गमवावा लागू शकतो तर कधी  गंभीर अपघात होतो. केरळमधील अलुवा येथून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये बालवाडीचा विद्यार्थीनी चालत्या स्कूल बसमधून पडताना दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने  अनर्थ टळला. (Girl student falls from moving school bus in Aluva, video goes viral)

व्हिडिओमध्ये फैजा नावाची विद्यार्थिनी घरी परतत असताना शाळेच्या बसच्या आपत्कालीन दरवाजातून पडताना दिसत आहे. हा अपघात आजूबाजूच्या स्थानिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी तत्काळ इतर वाहनांना थांबण्यास सांगितले आणि मुलाला वाचवले. फुटेजमध्ये मुलगी खाली पडल्यानंतर हळू हळू उठताना दिसत आहे कारण लोक तिच्या मदतीला आले आहेत. 

लग्नानंतर वजन वाढलं म्हणून पतीनं मागितला घटस्फोट; महिलेची आपबीती ऐकून पोलिस म्हणाले...

रिपोर्टनुसार, कोचीच्या अलुवा येथील अल-हिंद शाळेतील या बालवाडीच्या विद्यार्थीनीला या घटनेत अनेक ठिकाणी जखमा झाल्या. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया