Join us

Start up Owner Offers Job to Matrimonial Match : वडिलांनी पाठवली लग्नासाठी स्थळाची माहिती, लेकीनं त्यालाच पाठवली नोकरीच्या मुलाखतीची लिंक आणि मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:55 IST

Start up Owner Offers Job to matrimonial match : गडबडीत तिनं स्थळालाच मुलाखतीची लिंक पाठवली. तिनं या स्क्रिन शॉटसुद्धा शेअर केले आहेत. सगळ्या घोळाचे स्क्रिन शॉट स्वत:च शेअर केले आहेत.

अनेक पालकांसाठी, त्यांच्या मुलांसाठी परिपूर्ण जीवनसाथी शोधणं अवघड वाटतं. आजकाल आपल्याला हवातसा जोडीदार मिळावा यासाठी मेट्रोमोनियल साईट्सची मदत बरेच तरूण तरूणी घेतात.  बेंगळुरूच्या एका स्टार्ट-अप कंपनीच्या बॉसला कल्पना नव्हती की तिचे वडील  मुलीचे हात पिवळे करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.  या प्रकरणामध्ये मुलीने अशी चूक केली की ती आणि तिच्या वडिलांमधील मेसेजची देवाणघेवाण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  लोक त्यांना आपापल्या परीने सल्लाही देत ​​आहेत. एकूणच, हे  प्रकरण खूप मनोरंजक आहे. (Bengaluru start up owner offers job to matrimonial match internet is in splits)

वडीलांनी लग्नासाठी स्थळ पाठवलं अन् मुलीनं दिली जॉब ऑफर

उदिता पाल, बेंगळुरूस्थित स्टार्ट-अप कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. हे एक फिनटेक प्लॅटफॉर्म आहे जे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी सेवा प्रदान करते. सध्या स्टार्टअपसाठी ती उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्यानं चुकून वडिलांनी पाठवलेल्या मुलालाच तिनं मुलाखतीची लिंक पाठवली आणि रिझ्यूमे पाठवायला सांगितला.  कामाच्या झपाट्यात तिला वाटलं की जॉबसाठीच माहिती आली आहे.नंतर तिला वडिलांकडून समजलं की, गडबडीत तिनं स्थळालाच मुलाखतीची लिंक पाठवली. तिनं या स्क्रिन शॉटसुद्धा शेअर केले आहेत. सगळ्या घोळाचे स्क्रिन शॉट स्वत:च शेअर केले आहेत.

वडिलांनीच उदिताला मेसेज केला की, तू काय घोळ घातला आहेत पाहिलंस का? आता त्या मुलाच्या वडिलांना मी काय उत्तर देऊ? लग्नासाठी आलेल्या स्थळाला कुणी अशी नाेकरीच्या मुलाखतीची लिंक पाठवतं का?उदिता विनोदानं म्हणते, वडील आता मला डिसओन करतात की काय अशी भीती आहे. तिनं आपण कामाच्या धावपळीत कशी चूक केली हे स्वत:च शेअर केलं आहे. अनेकांनी मग तिला झाल्या घोळाबद्दल पर्यायही सुचवले आहेत.कामाच्या ताणाखाली तरुण मुलंमुली कसे पिचलेले असतात त्याचंच हे जरा विनोदी उदाहरण. पाठवणीच्यावेळी नवरी राहीली बाजूला अन् नवराच रडायला लागला; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले.....

  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानोकरी