Join us

आईकडे पाणी मागण्याची बाळाची मनमोहक स्टाईल! गोंडस बाळाचा व्हिडिओ व्हायरल; खास इनोसन्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 18:59 IST

Viral Video of a Cute Baby: आईला पाणी मागण्याची बाळाची खास स्टाईल, गोंडस बाळाचा व्हिडिओ व्हायरल...

ठळक मुद्देत्या लहानग्या बाळाच्या निरागस बाललीला पाहून नेटिझन्स त्याच्यावर फारच खुश झाले आहेत. तब्बल दिड लाखांपेक्षा जास्त लाईक्स त्या व्हिडिओला मिळाल्या आहेत.

एक वर्षाच्या आतल्या बाळाला तहान, भूक या गोष्टी थोड्या थोड्या समजायला लागलेल्या असतात. पण बोलता येत नसल्याने त्या मागायच्या कशा, हे कळत नाही. अशावेळी प्रत्येक बाळ त्याची त्याची खास स्टाईल तयार करतं आणि त्यानुसार त्याच्या आईला काय हवं, काय नको ते सांगत असतं. काही काही बाळांनी (Baby demands for water) तर वस्तूंची नावंही वेगवेगळी ठेवलेली असतात. चिमुकल्यांची ही स्पेशल कोड लॅंग्वेज फक्त त्यांच्या पालकांनाच कळते. आता या बाळाचंही (Special style of a cute baby) तसंच झालं. त्याला काय पाहिजे आहे, तो काय सांगतोय, हे फक्त त्याच्या आईलाच लक्षात येत आहे.

 

सध्या सोशल मिडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. petite_speech या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या लहानग्या बाळाच्या निरागस बाललीला पाहून नेटिझन्स त्याच्यावर फारच खुश झाले आहेत. तब्बल दिड लाखांपेक्षा जास्त लाईक्स त्या व्हिडिओला मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय त्यावरून असं लक्षात येत आहे की बाळाचं नुकतंच जेवण झालं आहे. जेवण झाल्यानंतर बाळाला तहान लागली आहे आणि त्याला त्याच्या आईला पाणी मागायचं आहे.

जळकट, काळपट भांडी स्वच्छ करण्याचे 6 सोपे उपाय, भांडी होतील स्वच्छ- चकाचक 

त्याला बोलता तर येत नाही. त्यामुळे मग त्याने पाण्यासाठी एक खास स्टाईल केली आहे. पाणी मागण्यासाठी तो त्याची बोटं ओठांवर फिरवतो आहे. तो हे जे काय करतो आहे, त्यावरून त्याला पाणी पाहिजे आहे, हे आईने ओळखलं आणि त्याला पाण्याचं सिपर दिलं. ते पाहुन तो लहानगा एकदम खुश झाला. त्याचं तेच तर मोहक हास्य नेटीझन्सला खूपच आवडून गेलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामलहान मुलं