lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

Sonam Kapoor chooses a unique Ladakhi attire for Anant-Radhika's 'Heritage Indian' theme night : सोनम कपूरचा अप्रतिम देखणा पोषाख, रॉयल लूकची खास स्टाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2024 04:22 PM2024-03-05T16:22:24+5:302024-03-05T16:23:33+5:30

Sonam Kapoor chooses a unique Ladakhi attire for Anant-Radhika's 'Heritage Indian' theme night : सोनम कपूरचा अप्रतिम देखणा पोषाख, रॉयल लूकची खास स्टाइल

Sonam Kapoor chooses a unique Ladakhi attire for Anant-Radhika's 'Heritage Indian' theme night | लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

लडाखचे पारंपरिक सिल्क वापरुन सोनम कपूरने बनवला खास ड्रेस! घातले आई आणि सासूचे दागिने

अंबानी (Ambani Wedding) कुटुंबियांची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. चर्चेचं कारण अनंत अंबानीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन आणि त्यात दिग्गजांनी लावलेली हजेरी. बरेच कलाकार आपल्या हटके आउटफिटमध्ये दिसून आले. मुख्य म्हणजे इतर कलाकारांपेक्षा अभिनेत्री सोनम कपूरच्या आउटफिटची चर्चा सोशल मीडियात रंगली. लडाखच्या पारंपारिक पोशाखात आलेली सोनम इतकी शाही आणि सुरेख दिसत होती, की तिच्यावर प्रत्येकाच्या नजरा खिळल्या होत्या (Sonam Kapoor Ahuja).

तिचा पारंपारिक लूक लक्षवेधी तर ठरलाच, शिवाय तिने गळ्यात घातलेला नेकलेस हा तिचा नव्हता, त्याचीही एक खास गोष्ट आहे (Fashion). सोनमचा आउटफिट इतका चर्चेत का आला? आउटफिटचं वैशिष्ठ्य काय?(Sonam Kapoor chooses a unique Ladakhi attire for Anant-Radhika's 'Heritage Indian' theme night).

सिल्कच्या कपड्यात उठून दिसलं सोनमचं सौंदर्य

अनंत अंबानीच्या प्री वेडिंगमध्ये काही थीम्स आयोजित करण्यात आले होते. प्री वेडिंगच्या शेवटच्या विरासत थीममध्ये सोनम कपूरने लडाखचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता. ज्यात ती शाही आणि सुरेख दिसत होती.  सोनम हिने घातलेले कपडे नामझा डिजाइनिंग हाउसने डिझाईन केला होता. सोनमचा हा सिल्क आउटफिट बनारसी कारागिरांनी तयार केला होता. आउटफिटवर केलेली फिनिक्स एम्ब्रॉयडरी सोनमच्या लूकमध्ये आणखी भर घालत होती.

पेस्टल ग्रीन आणि राणी पिंक कलर कॉम्बिनेशन अप्रतिम दिसत होते

सोनमचा हा ड्रेस अनारकली सूटसारखा दिसत होता. वरचा पोशाख हिरव्या रंगाचा होता, तर पलाझो पॅण्ट गुलाबी रंगाची होती. ड्रेसचा दुपट्टाही गुलाबी रंगाचा होता. जो सोनेरी नक्षीने सजलेला होता. हे रंग एकत्रितपणे एक अद्भुत कॉन्ट्रास्ट तयार करत होते. लडाखचे सौंदर्य दाखवणाऱ्या या पोशाखात सोनम खरोखरच एखाद्या महाराणीप्रमाणे दिसत होती.

होगी रिहाना , होगी बेयॉन्से, साड्डी ता ऐ है, करीना.. दिलजित असे म्हणाला आणि..

सोनमचा स्टनिंग डायमंड नेकलेस

सोनमने पारंपारिक पोशाखावर सुंदर आणि रॉयल नेकलेस घातला होता. तिच्या गळ्यात एक मोठा हार होता, ज्यामध्ये हिरे आणि पाचू जडले होते. सोनमच्या कानात मॅचिंग कानातले होते, जे मोत्यांनी सजले होते. अभिनेत्रीने मॅचिंग ब्रेसलेट आणि अंगठीही घातली होती. तिच्या पायात सुंदर डिझाइनर अँकलेट्स देखील होते. या ज्वेलरीमुळे सोनमचा लूक रॉयल दिसत होता.

फ्लश करताना कमोडचे झाकण उघडेच ठेवता? घरात पसरेल बॅक्टेरियाचं साम्राज्य-गंभीर आजार होण्यामागे..

हे दागिने सोनमचे नव्हते..

सोनमने पोशाखावर रॉयल दागिने घातले होते, ते तिचे नसून आई सुनीता कपूर, मावशी कविता सिंह आणि सासू प्रिया आहुजा यांचे होते. तिने या पोशाखावर त्यांचे दागिने घालून लूक कम्प्लीट केला होता. 

Web Title: Sonam Kapoor chooses a unique Ladakhi attire for Anant-Radhika's 'Heritage Indian' theme night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.