Join us

Popcorn using Hair Straightener: हेअर स्ट्रेटनर वापरून बनविले गरमागरम पॉपकॉर्न!! बघा कशी लढविली शक्कल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 18:44 IST

Social viral: ही महिला करते आहे, तशा पद्धतीने हेअर स्ट्रेटनरचा ( making popcorn using hair straightener) उपयोग कुणीही कधीही केला नसेल.. शंका वाटत असेल तर जबरदस्त व्हायरल (viral video) झालेला तिचा हा व्हिडिओ बघाच..

ठळक मुद्दे तिचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव खरोखरंच खूप छान आणि बघण्यासारखे होते...

वस्तू सांभाळून ठेवा... कधी, कशासाठी, कोणती वस्तू उपयोगाला येईल काही सांगता येत नाही... असं आपल्याकडे अगदी लहानपणापासून शिकविण्यात येतं, ते काही उगीच नाही.. संसार करताना, घर चालवताना तर घरातल्या घरात महिलांना अशा अनेक गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पण म्हणून चक्क हा असा प्रयोग करायचा, हे म्हणजे खूपच गंमतशीर झालं.. म्हणूनच तर एकदा बघाच हा हेअर स्ट्रेटनरचा वापर करून पॉपकॉर्न ( making popcorn using hair straightener) तयार करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) झाला आहे..

 

अशा भन्नाट पद्धतीने पॉपकॉर्न तयार करणाऱ्या या महिलेचं नाव आहे स्टेफनी चेउंग (Stephany Chaung). इन्स्टाग्रामवर (instagram) तिने @laparasian या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. स्टेफनी कंटेंट क्रियेटर असून ती नेहमीच असे मजेदार व्हिडिओ बनवत असते. त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिचे बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत. ब्यूटी आणि फूड या दोन विषयांवर नेहमी तिचे व्हिडिओ असतात. पण आता तर यावेळी तिने कमालच केली असून चक्क ब्यूटी इन्स्ट्रूमेंट्सचा उपयोग करून पदार्थ कसा बनवायचा हेच सांगितलं आहे. स्टेफनीचा हा व्हिडिओ हजारो लोकांना आवडला आहे..

 

या व्हिडिओमध्ये स्टेफनीने हेअर स्टेटनरमध्ये एक मक्याचा दाणा ठेवला आणि हेअर स्ट्रेटनर मशिन सुरू केले. सुरुवातीचे काही सेकंद तो दाणा जशास तसाच होता. त्यानंतर मात्र अचानक तो फुलला आणि त्याचा पॉपकॉर्न तयार झाला. पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर स्टेफनी स्वत:देखील खूपच आश्चर्यचकीत झाली. तिचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे भाव खरोखरंच खूप छान आणि बघण्यासारखे होते, हे नक्की.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअन्नइन्स्टाग्राम