Join us

Social Viral : कमाल! व्हायरल होतोय ९ वर्षांच्या दया बेनचा भन्नाट व्हिडीओ; तिची एक्टिंग पाहून लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:06 IST

Social Viral little dayaben : जर तुम्हीसुद्धा दया बेनला मिस करत असाल तर ही 'छोटी दया' नक्कीच पाहा. या मुलीचा अभिनय पाहून लोकांनी  तिला छोटी द्या असं म्हटलंय. 

टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडी शोव्ह तारक मेहता का उल्टा चश्मा मागच्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात आणि आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी शैलीमुळे चांगलेच आठवणीत राहतात.

खासकरून दया भाभी आणि त्यांचा गरबा शोव्ह युजर्सना खूप आवडतो. सध्या नवरात्रीच्या दिवसात चाहते दया भाभींची खूप आठवण काढत आहेत. शो निर्मात्यांना दया बेनची जागा घेणारं अद्याप कोणीही सापडलेलं नाही. जर तुम्हीसुद्धा दया बेनला मिस करत असाल तर ही 'छोटी दया' नक्कीच पाहा. या मुलीचा अभिनय पाहून लोकांनी  तिला छोटी द्या असं म्हटलंय. 

हा व्हिडिओ दया बेन म्हणजेच दिशा वाकानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दया बेनची छोटी चाहती दया बेन म्हणून दिसत आहे आणि ती दया बेनसारखीच वागत आहे. दया बेनसारखी नक्कल करत ती म्हणते, 'अंजली भाभी, हा नवरात्रीचा सण आहे, नवरात्री. नाचण्याचा, उड्या मारण्याचा सण आहे. तुम्ही म्हणता की अंताक्षरी खेळायची-'बैठे बैठे क्या करे करना है कुछ काम!' 

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुम्हाला आमची ९ वर्षांची लहान दयाबेन सुमन कशी वाटली?' आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'तुम्हाला आमची ९ वर्षांची लहान दयाबेन सुमन कशी वाटली? चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया