Join us

Social Viral : 'नवराई माझी लाडाची लाडाची गं'; या गाण्यावर हवाई सुंदरीनं धरला ठेका; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:32 IST

Spice jet air hostess dances to sridevi song : उषाने गेल्या आठवड्यात तिचा हा डान्स व्हिडिओ पोस्ट केला. आतापर्यंत तो हजारो वेळा पाहिला गेला आहे.

ठळक मुद्दे या गाण्याने लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, पण एअर होस्टेसने या गाण्यावर नाचून लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ  व्हायरल होतात. विशेषतः हटके डान्सचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. सध्या एका हवाईसुंदरीचा डान्स व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस नाचताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एअर होस्टेस जी एस्केलेटरवर नाचत आहे, तिचं नाव उषा मीनाक्षी असल्याचं  सांगितले जात आहे.

उषाने गेल्या आठवड्यात तिचा हा डान्स व्हिडिओ पोस्ट केला. आतापर्यंत तो हजारो वेळा पाहिला गेला आहे. उमाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एयरपोर्ट स्टैंडबाय लाइक हो. वॉकवेवर उमा यांनी गौरी शिंदे यांच्या 2012 च्या इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील 'नवराई माझी लाडाची लाडाची गं' या गाण्यावर नृत्य केले. उषा मीनाक्षीचा हा डान्स व्हिडिओ लोकांना खूप आवडला.  

एका युजरनं सांगितले की, या गाण्याने लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, पण एअर होस्टेसने या गाण्यावर नाचून लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.  त्याचवेळी, दुसऱ्या युजरनं सांगितले की मला हे गाणे आवडते आणि एअर होस्टेसचा डान्स देखील. इंटरनेटवर लोकांना हा डान्स व्हिडिओ किती आवडलाय याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. त्याला आतापर्यंत 37,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलेल्या नवराई माझी या गाण्याला सुनिधी चौहान, स्वानंद किरकिरे, नताली डी लुशियो आणि नीलांबरी किरकिरे यांचे स्वर आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या श्रीदेवीवर हे गाणे चित्रित करण्यात आले होते.

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया