Join us

Social Viral pawari girl : सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी पावरी गर्ल आठवतेय का? पुन्हा व्हायरल झालाय तिचा नवा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:18 IST

Social Viral pawari girl : आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

ठळक मुद्देदानानीर ही एक सोशल मीडिया इंफ्लूएंजर आणि कंटेट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.६ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर पावरी गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली पाकिस्तानी तरूणी सगळ्यांचाच लक्षात राहिली. दानानीर मोबीन उर्फ गीना आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओत पावरी गर्ल गाणं गाताना दिसून येत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिलं आहे.

दानानीर मोबीनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ पावरी बोलण्याच्या स्टाईलप्रमाणेच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती 'खोया जो तू होगा मेरा क्या' हे गाणं गात आहे. आतापर्यंत ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर चाहते कौतुकास्पद रिएक्शन्स देत आहेत. या आधीसुद्धा तेरा मेरा रिश्ता पुराना हे गाणं गायल्यानं दानानीर चर्चेत होती. 

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दानानीरचा व्हिडीओ तुफान व्हायरल  झाला होता. फेब्रुवारीमध्ये तिच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये 'पावरी' बोलण्याची तिची शैली खूपच गमतीदार होती. यानंतर, भारतासह अनेक देशांमध्ये त्याच्या शैलीची कॉपी करत अनेक व्हिडिओ शेअर केले गेले. दानानीर हे तेव्हापासून सोशल मीडियामध्ये एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे.

कोण आहे पावरी गर्ल

दानानीर ही एक सोशल मीडिया इंफ्लूएंजर आणि कंटेट क्रिएटर आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.६ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच आपल्या चाहत्यासह वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. ''यह हमारी कार है, और ये हम है. और यह हमारी पावरी हो रही है" हे वाक्य फ्रेबुवारीत खूप व्हायरल झालं होतं.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापाकिस्तान