Join us

Social Viral : कमाल! एखाद्या बाईलाही लाजवेल इतकी सुंदर साडी नेसतोय हा तरूण; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 16:30 IST

Social Viral : आतापर्यंत तुम्ही बायकांनाच साडी नेसलेलं पाहिलं असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात येईल की पुरूषही साडी नेसून सुंदर आऊटफिट स्वत:साठी बनवू शकतात. (Men wearing saree) 

सणासुदीला किंवा एखाद्या कार्यक्रमाला महिला आवर्जुन साड्या नेसतात. साड्या आणि पारंपारिक लूक शिवाय कोणताही सण साजरा केल्यासारखा वाटत नाही.  पुरुषही त्याबाबतीत मागे नाहीत. होय, सोशल मीडियावर सध्या पुरूषांच्या आगळ्या वेगळ्या फॅशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Viral Video) आतापर्यंत तुम्ही बायकांनाच साडी नेसलेलं पाहिलं असेल पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला लक्षात येईल की पुरूषही साडी नेसून सुंदर, अप्रतिम आऊटफिट स्वत:साठी बनवू शकतात. (Men wearing saree) 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एखाद्या बाईलाही लाजवेल अशा पद्धतीनं हा तरूण ऑफ व्हाईट साडीच्या निऱ्या घालताना दिसून येतोय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. अगदी काही मिनिटात या माणसानं साडी कमरेभोवती गुंडाळली आहे. गुलाबी रंगाची साडी काष्टा नेसल्याप्रमाणे त्यानं नेसली आणि त्याचा पदर खांद्यावर घेतला. या आऊटफिटवर चॉकलेटी रंगाची मोजडी अगदी शोभून दिसत आहे. 

तुफान या फेसबुकपेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, 'बायांनो साड्या लपवून ठेवा. पुरूषांसाठीपण साडी फॅशन झाली आहे.' असं कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत लाखो लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून ९  हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत तर अनेकांना पुरूषानं साडी नेसणं खटकलं असून वादग्रस्त कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. 

याआधीही अनेक अभिनेत्यांनी अशी फॅशन केलेली पाहायला मिळाली. खासकरून रणवीर सिंग आपल्या या साडीच्या फॅशनमुळे चर्चेच राहिला. रणवीर सिंह आपल्या  हटके फॅशन ट्रेंडमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याचे अशा हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.

टॅग्स :फॅशनसोशल व्हायरलसोशल मीडिया