Join us

Social Viral : लेक एअरपोर्टवर मस्त बुके घेऊन आला; अन् आईनं चपलेनं चोपचोप चोपला; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 15:43 IST

Social Viral : 'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर आई मुलाच्या नात्याचा  हटके व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतीय माता आपल्या मुलांवरून जीव ओवाळून टाकतात पण राग आला की मग मात्र खैर नाही. झाडू, चप्पल हातात जे काही असेल ते फेकून मारणं काही नवीन नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये परदेशातून परत आलेल्या मुलाला या आईनं चक्क चपलेनं मारायला सुरूवात केली आहे. असा विनोदी व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. 

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या क्लिपमध्ये अन्वर जिबावी विमानतळावर चालत असताना ''वी मीस यू" चा फलक घेऊन चालत होता. तितक्यात त्याची  आई त्याला बुके आणि फलक घेऊन येताना पाहते आणि रागारागात पायातील चप्पल काढून मारून फेकते. पाकिस्तानी कुटुंबात वाढलेल्या अन्वरसाठी हे काही नवीन नव्हते. पण एअरपोर्टवर आईचा राग पाहून त्यालाही हसू अनावर होतं. 

कंडोम वापरलं म्हणजे एचआयव्हीचा धोका टळतो? बेजबाबदार लैंगिक वर्तनामुळे तरुण मुलं मुली धोक्यात..

हा मजेदार व्हिडिओ ५ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी  लाईक केला असून 130 दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. आईची रिएक्शन पाहून नेटिझन्सचा हसू अनावर झालं आहे. लोकांनी या व्हिडीओवर विनोदी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  'तू  १५ वर्षांपूर्वी  तुझी रूम स्वच्छ केली नव्हती हे आईच्या अजूनही लक्षात आहे.' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. तर एकानं प्रेम व्यक्त करण्याचा हा योग्य मार्ग असल्याचं म्हटलं आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया