संसार नवा असो की जुना, समस्त गृहिणींना स्वयंपाकाचे टेंशन सतावते. रेसिपी बघणे आणि करणे यात बराच फरक असतो. कारण दोन मिनिटाच्या रील मध्ये दाखवलेल्या रेसिपी करायला दोन तास लागतात. इतर कामाच्या धबडग्यात स्वयंपाकघरात तासन तास राबणे कोणाही स्त्रीला विशेष आवडत नाही. पण जेवणाची सोय तर रोजच करावी लागते. पण, भारतात एक गाव असे आहे, जिथे स्वयंपाक न करताही दोन वेळच्या पोटभर जेवणाची सोय होते. रांधा, वाढा, उष्टी काढा या धबडग्यातून सुटकाच, नाही का? अशा गावी तुम्हालाही जायला आवडेल का? चला त्या गावाबद्दल जाणून घेऊ.
गुजरातचे चांदनकी (Chandanki Village) गाव आहे, जेथे पिढ्यानपिढ्या गावकरी त्यांच्या घरांमध्ये स्वयंपाक करत नाहीत. यामागे एक जुनी आख्यायिका आणि गावकऱ्यांची परम श्रद्धा दडलेली आहे आणि गंमत म्हणजे आजही ती प्रथा अविरतपणे सुरु आहे.
चांदनकीची अनोखी परंपरा
गुजरात राज्यातील हे गाव अनेक वर्षांपासून ही आगळीवेगळी परंपरा पाळत आहे. या गावात तुम्ही कोणत्याही घरात गेलात तरी तुम्हाला चुली पेटलेल्या किंवा स्वयंपाक बनवलेला दिसणार नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे, गावकऱ्यांचे त्यांच्या ग्रामदेवतेवरील (Village Deity) असलेले अपार प्रेम आणि श्रद्धा.
या परंपरेमागची आख्यायिका
स्थानिक आख्यायिकेनुसार, चांदनकी गावात सुमारे ४०० वर्षांपूर्वी एका संत किंवा तपस्वींचे आगमन झाले होते. त्यांनी या गावात तपस्या केली आणि गावकऱ्यांचे कल्याण केले. गावाच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी एका देवीची स्थापना केली, जी आज गावाची ग्रामदेवी म्हणून ओळखली जाते.
जेव्हा त्या संतांनी गावाचा निरोप घेतला, तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, "या गावातील लोक माझ्या देवीवर अत्यंत प्रेम आणि निष्ठा ठेवतात, म्हणूनच येथील लोक देवीच्या मंदिरात एकत्र येऊन प्रसाद (Communal Meal) म्हणून अन्न ग्रहण करतील. जोपर्यंत ही परंपरा अखंड सुरू राहील, तोपर्यंत गावात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल आणि कोणतेही बाह्य संकट गावाला स्पर्श करणार नाही." गावकऱ्यांनी ही आज्ञा शिरोधार्य मानली आणि तेव्हापासून गावात घरोघरी स्वयंपाक न करण्याची परंपरा सुरू झाली.
भोजन कुठे आणि कसे बनते?
या परंपरेमुळे, चांदनकी गावात एक भव्य सामुदायिक स्वयंपाकघर (Community Kitchen) उभारले गेले आहे.
एकत्रित स्वयंपाक: गावातील सर्व घरांसाठी जेवण या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार केले जाते. गावातील लोक आपापसात श्रमदान करतात आणि स्वयंपाकाच्या कामात मदत करतात.
सर्वांसाठी अन्न: गावात कोणीही उपाशी राहत नाही. श्रीमंत असो वा गरीब, सर्वजण मंदिराजवळच्या या सामुदायिक भोजनालयात एकत्र जेवण करतात.
परंपरा आणि एकात्मता: या परंपरेमुळे गावातील लोकांमध्ये एकता (Unity) आणि बंधुत्वाची भावना बळावली आहे. घरोघरी स्वयंपाक न केल्याने वेळेची बचत होते आणि तो वेळ ते शेती किंवा इतर सामुदायिक कामांसाठी वापरतात.
श्रद्धेचे प्रतीक : या अनोख्या परंपरेमुळे हे गाव आज देशात ओळखले जाते. गावकऱ्यांचा असा विश्वास आहे की, त्यांनी ही परंपरा मोडल्यास देवीचा कोप होईल आणि गावात संकट येईल. ही जरी अंधश्रद्धा मानली तरी त्यामुळे गावात एकजूट आहे हे ही नसे थोडके. या गावातील तरुण शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त जरी बाहेरगावी गेले असले, तरी त्यांचे पालक आजही तिथे राहतात. अशा वृद्धांची जेवणाची आबाळ होऊ नये या दृष्टीनेही हा उपक्रम लाभदायी ठरतो. या गावात आज जवळपास ५०० लोक राहतात.
चांदनकी गाव हे सिद्ध करते की, श्रद्धा आणि सामुदायिक भावना एकत्र आल्यास, कोणतीही परंपरा किंवा नियम वर्षानुवर्षे टिकून राहू शकतो.
Web Summary : Gujarat's Chandanki village thrives on a unique tradition: no home cooking. Rooted in faith, villagers share communal meals prepared in a community kitchen. This fosters unity, saves time, and ensures everyone eats, upholding a centuries-old custom blessed by their village deity.
Web Summary : गुजरात का चांदनकी गाँव एक अनोखी परंपरा पर फलता-फूलता है: कोई घर का खाना नहीं। आस्था में जड़े, ग्रामीण एक सामुदायिक रसोई में तैयार किए गए सामुदायिक भोजन साझा करते हैं। इससे एकता बढ़ती है, समय की बचत होती है, और हर कोई भोजन करता है, जो उनके ग्राम देवता द्वारा आशीर्वादित सदियों पुरानी प्रथा को बनाए रखता है।