Join us

Social Viral : गालावर खळी पडण्यासाठी पोरीनं केला भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून व्हाल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 12:46 IST

Social Viral : व्हिडीओमधील या मुलीनं मार्करचा वापर करून गालावर एक सुंदर डिंपल तयार केलं आहे.  ती देसी जुगाड करत गालावर डिंपल बनवताना दिसत आहे.

सहजा असं दिसून येतं की ज्या लोकांच्या गालावर डिंपल असतात. त्यांच्याकडे लोक जास्त आकर्षित होतात. ज्यांच्या गालावर डिंपल नसतात, त्या लोकांना आपल्या गालांवर डिंपल पडावे असं वाटते. भारतात असे अनेक सेलिब्रिटी स्टार आहेत, जे त्यांच्या डिंपल स्माईलसाठी प्रसिद्ध आहेत. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, प्रिती झिंटा यांच्या गालावर पडणारे डिंपल्स त्यांच्या चेहऱ्याचे सौंदर्य आणखी वाढवतात. (Girl Made Dimple in Cheek You will be shocked to see the video)

व्हिडीओमधील या मुलीनं मार्करचा वापर करून गालावर एक सुंदर डिंपल तयार केलं आहे.  ती देसी जुगाड करत गालावर डिंपल बनवताना दिसत आहे. मुलीचा हा व्हिडीओ पाहून लोक चक्रावले. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या गालावर अतिशय अनोख्या पद्धतीने डिंपल बनवते. यानंतर, तिच्या गालावर खरोखरच डिंपल्स दिसू लागतात.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी दिसत आहे. सर्व प्रथम, हे पाहिले जाऊ शकते की तिच्या गालावर डिंपल नाही. यानंतर ती 'मार्कर पेन' घेते आणि तिच्या गालावर खूण करते. यानंतर ती ती खूण बोटाने घासते. यानंतर, जेव्हा ती हसते तेव्हा तिच्या गालावर डिंपल्स दिसू लागतात.  व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स थक्क झाले आहेत.

बहिणीच्या पाठवणीवेळी ढसाढसा रडला भाऊ; गळाभेट घेत बोलला 'असं' काही, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

इन्स्टाग्रामवर अॅडल्टग्राम_ नावाच्या अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडिओ खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काही लोक म्हणत आहेत की मुलीला आधीच डिंपल होते. बहुतेक लोक व्हिडिओवर आश्चर्यकारक इमोजी कमेंट करत आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया