Join us

स्वयंपाक करताना असा तडका दिला की वरचा मंडप..... बघा स्वयंपाक करण्याचा हा भन्नाट व्हायरल व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2023 17:49 IST

Viral Video Of Giving Tadka To Food: स्वयंपाक करण्याची आणि खास करून पदार्थाला तडका देण्याची ही पद्धत पाहून अनेकांना पाेटधरून हसू येत आहे....

ठळक मुद्देअशा भयानक पद्धतीने तुम्ही नेमका कोणता पदार्थ करत आहात, असा प्रश्नही काही जणांनी विचारला आहे. 

सोशल मिडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही एकदम गंभीर विषयांचे, भरपूर माहिती देणारे असतात, तर काही व्हिडिओ खूपच मजेशीर असतात. त्यापैकीच हा एक मस्त मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर गाजतो आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस स्वयंपाक करताना भांड्यातल्या पदार्थाला तडका म्हणजेच फोडणी घालत आहे. फोडणी घालताना नेमकं असं काही तरी होतं आणि मग त्याची जी काही फजिती होते (Fire broke out when making food), ते पाहून नेटकरींना हसू आवरत नाहीये. (Viral video of giving tadka to food)

 

स्वयंपाक करण्याच्या या भन्नाट पद्धतीचा व्हिडिओ prakash_ujjainy या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. नेमक्या कोणत्या गावचा व्हिडिओ आणि कुठला पदार्थ ते करत आहेत, हे सांगता येत नाही.

गव्हाच्या पिठाचा चवदार पिझ्झा- मुलांना डब्यातही देता येईल, मैद्याचा विकतचा पिझ्झा नकोच- बघा रेसिपी

पण व्हिडिओ पाहून तरी असा अंदाज येत आहे की त्या घरात काहीतरी कार्यक्रम असावा आणि त्यानिमित्ताने बऱ्याच लोकांचा स्वयंपाक तिथे होत असावा. त्या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका मोठ्या पातेल्यात काहीतरी पदार्थ करून ठेवलेला आहे. दुसरीकडे एक चूल पेटलेली आहे आणि त्या चुलीवर एका गृहस्थाने तडका केला आहे.

 

पातेल्यातली फोडणी झाल्यावर तो माणूस ते पातेले उचलतो आणि बाजूला ठेवलेल्या मोठ्या पातेल्यात त्यातला पदार्थ ओततो. पदार्थ ओतल्यावर लगेचच त्यातून आगीच्या ज्वाळा निघतात.

हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत

त्या ज्वाळा एवढ्या उंच जातात की त्यामुळे अक्षरश: वरचा मंडप जळून जातो. क्षणभर त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन व्यक्तींचे काय होते, याची भीतीही वाटते. असा हा थोडासा घाबरवून टाकणारा पण तेवढाच मजेशीर असणारा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. अशा भयानक पद्धतीने तुम्ही नेमका कोणता पदार्थ करत आहात, असा प्रश्नही काही जणांनी विचारला आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.