Join us

Social Viral : बहिणीच्या पाठवणीवेळी ढसाढसा रडला भाऊ; गळाभेट घेत बोलला 'असं' काही, ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 12:45 IST

Social Viral : व्हिडिओमध्ये बहिणीच्या पाठवणीच्यावेळी भावाची भावनिक प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे.

सगळ्याच घरातील भावंड एकमेकांशी भांडतात, रागावतात. पण  भांडणानंतरही भावंडांमध्ये विशेष प्रेमाचे बंध निर्माण होतात. नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ (Viral Video) या नात्याचे उत्तम उदाहरण आहे आणि ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. व्हिडिओमध्ये बहिणीच्या पाठवणीच्यावेळी भावाची भावनिक प्रतिक्रिया दाखवण्यात आली आहे.  (Brother gets emotional crying during sister vidai in kerala watch emotional video)

अभिराम एकने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये तो त्याची मोठी बहीण हर्ष शशिधरन सोबत दिसत आहे. हा व्हिडिओ केरळमध्ये 6 फेब्रुवारीला हर्षच्या लग्नाच्या दिवशी शूट करण्यात आला होता. हनान शाहच्या रांझा पार्श्वसंगीतावर सुरू असलेल्या या व्हिडिओमध्ये भाऊ आणि बहीण एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहे. बहिण सासरी जात असल्याचं त्याला दु:ख होत आहे, हे भावाच्या हावभावावरून दिसून येतंय

पोटावरच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतंय? स्लिम, रेखीव पोटासाठी आजपासूनच हे फळं खाणं टाळा, डॉक्टरांचा सल्ला

या व्हिडिओला शेअर केल्यापासून आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, होय, ती भावना आपल्या सर्वांना माहित आहे. हे आपल्या शरीराशी जोडलेल्या एखाद्या अवयवाप्रमाणे आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्सना अश्रू अनावर झाले आहेत. तर अनेकांना आपल्या बहिणीच्या पाठवणीच्या वेळचे क्षण आठवले.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया