Join us

Mom's bhangda: आईने केला जबरदस्त भांगडा; जोश असा की तरुणांना कॉम्प्लेक्स यावा; पाहा 'मॉम्स भांगडा' व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:26 IST

Trending video: बघा भांगड्याचं वेड असं की स्वयंपाक घरातच अगदी कामं अर्धवट सोडूनच या आजींनी (Bhangda dance by old lady) सुरू केला जबरदस्त  भांगडा.... 

ठळक मुद्देआजींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुम करत असून अवघ्या एक- दोन दिवसांत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.. 

ढोल- नगाडे वाजून भांगडा म्युझिक सुरू झालं की अगदी माणूस असेल तिथे थिरकू लागतो.. मग अगदी तो जगभरातल्या कोणत्याही कोपऱ्यातला माणूस का असेना.. मग इथे तर या व्हिडिओमधल्या मॉम अस्सल पंजाबन आहेत.. भांगडा बिट्स (mom's bhangda is viral on social media ) वाजत असताना, त्यांनी शांत बसणं तर निव्वळ अशक्य.. म्हणूनच तर भांगडाच्या तालावर त्यांनी असा जबरदस्त ठेका धरला की त्यांचा उत्साह पाहून नेटीझन्स अक्षरश: त्यांचे फॅन्स झाले आहेत..

 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या guggin94 या पेजवर शेअर करण्यात आला आहे. Momma’s favorite song असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलंय. यामध्ये असं दिसतंय की एक वयस्कर महिला स्वयंपाक घरात काम करते आहे.. ती महिला ज्यापद्धतीने भांगडा करते आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर ती जे काही बोलते, त्यावरून ती पंजाबीच असावी असं वाटतं... तर ती स्वयंपाक घरात काम करत असताना दोन तरूण आत येतात. त्यांच्यापैकी एकाच्या हातात नगाडा तर दुसऱ्याच्या हातात स्पिकर असतो.. 

 

हे दोघे आत येऊन 'ढोल जगीरों दा..' हे पंजाबीमधलं प्रसिद्ध गाणं वाजवतात. गाण्याचे बोल ऐकून आजीबाई एकदम हरखून जातात. हातातलं काम झटपट सोडून देतात आणि मोठ्या उत्साहात हात उंचावत भांगडा करायला सुरूवात करतात. आजी अवघ्या काही सेकंदासाठीच नाचल्या पण त्या नाचताना त्यांनी जो काही उत्साह आणि एनर्जी दाखवली ती तरूणांना निश्चितच लाजवणारी आहे... आजींचा भांगडा पाहून कुणालाही एकदा का हाेईना ठुमका मारावाच वाटतो... आजींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुम करत असून अवघ्या एक- दोन दिवसांत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियापंजाबनृत्यइन्स्टाग्राम