काळानुसार जखमा भरतात, पण काही पश्चात्ताप आयुष्यभर पाठ सोडत नाहीत असं म्हणतात. चीनमधील ४४ वर्षीय ली लिन यांनी गेली ३३ वर्षे अशीच घालवली आहेत. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी, भूक आणि हतबलतेपोटी त्यांनी आपल्या ७ वर्षांच्या छोट्या भावाला केवळ एका 'ब्रेड'च्या तुकड्यासाठी एका अनोळखी महिलेसोबत जाऊ दिले. त्याला किमान पोटभर अन्न मिळेल, या आशेने त्यांनी हे पाऊल उचललं होतं, पण तो भाऊ पुन्हा कधीच परतला नाही.
चीनच्या हुबेई प्रांतातील झियांतो शहरात घडलेल्या या घटनेने सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ली लिन यांनी ३३ वर्षांनंतर आपल्या भावाला शोधून काढलं, तेही केवळ बालपणातील एका जुन्या फोटोच्या आधारे. लहानपणीच या बहीण-भावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला, तर वडील मानसिक धक्क्याने घर सोडून निघून गेले.
आयुष्यातील सर्वात मोठा पश्चात्ताप
११ आणि ७ वर्षांची ही मुलं अनाथ झाली आणि अन्नासाठी रस्त्यावर भटकू लागली. एक दिवस पावसापासून वाचण्यासाठी दोघे एका ट्रकच्या मागे झोपले आणि नकळत दुसऱ्या शहरात पोहोचले. तिथे भुकेने व्याकुळ झालेल्या छोट्या भावाला एका वृद्ध महिलेने ब्रेडचं आमिष दाखवलं. बहिणीने विश्वास ठेवला, पण तो क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा पश्चात्ताप ठरला, कारण तिचा भाऊ तिथूनच बेपत्ता झाला.
छोट्या भावाला तस्करांनी पकडलं होतं, जिथे त्याला मारहाण, उपासमार आणि बंद खोलीत कैद अशा यातना सोसाव्या लागल्या. कसातरी तो तिथून निसटला आणि भीक मागून जगू लागला. पुढे तो ग्वांगडोंगला पोहोचला, जिथे एका कुटुंबाने त्याला दत्तक घेतलं आणि नवीन ओळख दिली.
बहिणीने कसा घेतला शोध?
ली लिन यांनी आपल्या भावाचा शोध घेण्यासाठी ३३ वर्षे हार मानली नाही. त्यांनी विटा उचलणं, भांडी घासणं आणि कारखान्यात मजुरी करणं अशी कष्टाची कामं करून पैसे जमवले आणि संपूर्ण चीनमध्ये भावाचा शोध घेत राहिल्या. त्यांच्याकडे आधार म्हणून केवळ एक जुना फोटो होता. यावर्षी जियांग्शी येथील एका पोलीस अधिकाऱ्याने 'फेस रिकग्निशन' तंत्रज्ञानाच्या मदतीने एका व्यक्तीची ओळख पटवली, जो ली लिन यांचा भाऊ असल्याचं समोर आलं. डीएनए चाचणीनंतर यावर शिक्कामोर्तब झाले आणि २३ मार्च रोजी दोन्ही बहीण-भावांची भेट झाली. एकमेकांना मिठी मारून दोघेही ढसाढसा रडले.
Web Summary : Driven by guilt, a Chinese woman spent 33 years searching for her brother, whom she lost as a child. Poverty forced her to let him go for food. Using an old photo and facial recognition, they reunited, sharing tears of joy after decades apart.
Web Summary : अपराधबोध से प्रेरित होकर, एक चीनी महिला ने अपने भाई को खोजने में 33 साल बिताए, जिसे उसने बचपन में खो दिया था। गरीबी ने उसे भोजन के लिए उसे जाने देने के लिए मजबूर किया। एक पुरानी तस्वीर और चेहरे की पहचान का उपयोग करके, वे दशकों बाद खुशी के आँसू साझा करते हुए फिर से मिले।